Home विदर्भ युक्रेन मध्ये अडकला वाशीम चा आमलन व्यास ,परंतु जिल्हा प्रशासनाकडे मात्र विध्यार्थ्याची...

युक्रेन मध्ये अडकला वाशीम चा आमलन व्यास ,परंतु जिल्हा प्रशासनाकडे मात्र विध्यार्थ्याची नोंदच नाही

95
0

राजेंद्र पाटील राऊत

देवेंद्र सुरेश कलकोट – वाशीम तालुका प्रतिनिधी

युवा मराठा न्युज

युक्रेन मध्ये अडकला वाशीम चा आमलन व्यास ,परंतु जिल्हा प्रशासनाकडे मात्र विध्यार्थ्याची नोंदच नाही

एकीकडे युक्रेन मध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देशात सुखरूप आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाशिम जिल्हा प्रशासनाकडे विदेशात असलेल्या आमलन व्यासची साधी नोंदही नसल्यामुळे या बाबतीत प्रशासन किती गंभीर आहे, हे यावरून दिसून येते आहे.
वाशीम : वाशीम शहराच्या आयुडीपी कॉलनी येथील आमलन प्रकाश व्यास हा विद्यार्थी एम बी बी एस च्या चौथ्या वर्षाला आहे. तर, तो युक्रेन मधील विनीतसा मध्ये शिक्षण घेत आहे. युक्रेनमधून भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. मात्र जिल्हा प्रशासनाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. मागील चार दिवसापासून रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू असून, त्याला भारतात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.
मात्र, आमचा मुलगा रोमानिया बॉर्डर वर पोहचला आहे. दरम्यान तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याची माहिती मुलांकडून मिळाली आहे. तरी आमच्या मुलाची तिथे व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती आमलन याचे वडील प्रकाश व्यास यांनी भारत सरकारला केलेली आहे. वाशिम शहरातील आमलन प्रकाश व्यास हा युक्रेन मध्ये अडकला असला तरी याची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाकडे कालपर्यंत उपलब्ध नव्हती. एकीकडे युक्रेन मध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देशात सुखरूप आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वाशिम जिल्हा प्रशासनाकडे विदेशात असलेल्या आमलन व्यासची साधी नोंदही नसल्यामुळे या बाबतीत प्रशासन किती गंभीर आहे, हे यावरून दिसून येते आहे.

Previous articleसौ.गंगासागर भास्कर चव्हाण यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
Next articleमुखेड रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटचा शुभारंभ खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here