Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने राजीव गांधी नगरपरिषद प्राथमिक शाळा येथे...

भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने राजीव गांधी नगरपरिषद प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना बुक,पेन व खाऊचे वाटप

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220702-WA0007.jpg

भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने राजीव गांधी नगरपरिषद प्राथमिक शाळा येथे वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना बुक,पेन व खाऊचे वाटप

शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने वृक्षारोपण व शालेय विद्यार्थ्यांना बुक,पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.
शहरातील राजीव गांधी नगरपरिषद प्राथमिक शाळा हनुमान वार्ड येथे खासदार अशोकजी नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,जिल्हा संघटन मंत्री रवींद्र ओल्लारवार,एस.टी. मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना बुक,पेन व खाऊचे वाटप करण्यात आले .
तत्पुर्वी स्थानिक इंदिरा गांधी चोकातील विश्राम भवन येथे शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे यांच्या वाढदिवसाचा केक कापून व पुष्पगुच्छ देवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, युवा मोर्चा शहर महामंत्री हर्षल गेडाम,सुभाष उप्पलवार,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम,लता लाटकर, नीता उंदीरवाडे,रोशनी बानमारे,निलिमा राऊत,पुनम हेमके,कोमल बारसागडे,ज्योती बागडे,राजू शेरकी,देवाजी लाटकर,विलास नैताम,श्याम वाढई तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here