Home गडचिरोली सत्तासंर्घातही शिवसेनेची जनतेशी असेलेली बांधीलकी कायम !

सत्तासंर्घातही शिवसेनेची जनतेशी असेलेली बांधीलकी कायम !

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20220702-WA0016.jpg

सत्तासंर्घातही शिवसेनेची जनतेशी असेलेली बांधीलकी कायम !                                            गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सत्तातरानंतरही शिवसैनिक जनसेवे साठी एक सेकंदात ऑन फील्ड

शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा-मौशिखाब जिल्हा परिषद क्षेत्रातील आंबेशिवणी-गिलगाव रस्ता कामाला सुरवात

शिवसेना हा जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा पक्ष आहे.सत्ता असो की नसो शिवसेना सदैव जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या कट्टर शिवसैनिकांची सेना आहे. आमची बांधीलकी जनतेशी असून जनतेच्या मदतीसाठी आम्ही शिवसैनिक नेहमीच तत्पर राहणार,असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले आहे.शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा-मौशिखाब जिल्हा परिषद क्षेत्रात तब्बल पाऊनेचार कोटीची रस्ता कामे मंजूर होऊन काही कामे पुर्ण झाली तर काही कामांना सुरवात झाली आहे.नुकतेच अरविंदभाऊ कात्रटवार व शिवसैनिकांनी आंबेशिवणी-गिलगाव रस्ता कामाची पाहणी केली.तसेच नागरिकांशी संवाद साधला.अमिर्झा, मौशीखांब मुरमाडी क्षेत्रातील रस्त्यांची विदारक स्थिती झाली होती.रस्त्यांवरून मार्गक्रमण करणे त्रासदायक झाले होते. एवढेच नव्हे खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते.या भागातील रस्त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी चार महिन्यापुर्वी शिवसेनेच्या वतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता. ६या आंदोलनाची दखल घेऊन आंबेशिवणी – गिलगाव यासह अन्य तीन. चार रस्त्यांची कामे मंजूर झाली. आंबेशिवणी- गिलगाव या प्रमुख रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे. सत्तेचा बागलबुवा न करता जनतेच्या विकासाप्रती असलेली तळमळ आणि केलेल्या धडपडीमुळे कोणतीही समस्या सुटू शकते, हे शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार व त्यांच्या शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे, असे गौरोउद्गार आंबेशिवणी गिलगाव येथील नागरिकांनी काढले. कोणतीही समस्या असल्यास माझा समोर मांडा ती सोडविण्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन, असे आवाहन कात्रटवार यांनी नागरिकांना केले.याप्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके,संदीप भुरसे,स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे,संदीप अलबनकर,सूरज उइके, प्रशांत ठाकुर,माणिक ठाकरे,खुशल गव्हारे, प्रवीण मिसार,त्र्यम्बक फुलझले,गणेश ठाकरे,अंबादास मुंनघाते,खुशल मेश्राम, रोशन देशमुख, संदीप टेम्भूर्ण,तुकाराम फुलझेले, दिलीप चनेकर,धनेश्वर सुरकर,विनोद मुत्तेमवार,रविंद्र रणदिवे,प्रमोद स्याम,चंद्रदास मश्के, लालाजी बह्यल,मोतीराम भुरसे,हरबा दाजगये, तानाबा दाजगये, गोपाल मोगरकर, अजित कुकुड़कर, सूरज पासांडे,विजय भरणे,साजित कोडापे यांच्या सह गावकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here