Home नांदेड नांदेडचे अकुप्रेसर तज्ञ डॉ.संभाजी पवार द्वारे पंढरपूर दिंडीतील दोन हजार भाविकांचा सासवड...

नांदेडचे अकुप्रेसर तज्ञ डॉ.संभाजी पवार द्वारे पंढरपूर दिंडीतील दोन हजार भाविकांचा सासवड येथे दोन दिवस मोफत उपचार !

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20230618-WA0107.jpg

नांदेडचे अकुप्रेसर तज्ञ डॉ.संभाजी पवार द्वारे पंढरपूर दिंडीतील दोन हजार भाविकांचा सासवड येथे दोन दिवस मोफत उपचार !
अंबादास पाटिल पवार
लोहा, प्रतिनिधि
मागील सात वर्षा पासून सिडको नांदेड येथे सुजोक, अकुप्रेशर आणि निसर्गोपचार च्या साह्याने हजारो रुग्णावर यशस्वी उपचार करणारे पूजा हेल्थकेअर सेंटर चे संचालक , सुजोक, अकुप्रेसर निसर्गोचार तज्ञ डॉ.संभाजी अवधुतराव पवार आणि त्यांची टीम आळंदी पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सासवड येथील मुक्कामी दि.14आणि15 जून रोजी गुडघेदुखी,कंबरदुखी, मानपाठ दुःखी अश्या दुर्धर आजारावर सुजोक, अकूप्रेसर, मसाज द्वारे दोन हजार वारकऱ्यांचा मोफत उपचार केला.
माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविक आळंदी ते पंढरपूर पायी चालत जातात ज्यात वयस्कर पुरुष महिलांचा सहभाग असतो हडफसर ते दिवे घाट जवळपास 27 किलोमिटर घाटाचे अंतर चढल्या नंतर प्रचंड थकवा आणि गुडघे दुःखी होऊ शकते म्हणून सासवड या ठिकाणी माऊलीच्या विसाव्या जवळ दि.14आणि 15 जून रोजी डॉ.संभाजी पवार आणि त्यांची टीम गुडघे दुःखी , कंबरदुखी या आजारावर सुजोक आणि मसाज करून दोन हजार वारकऱऱ्या वर मोफत उपचार केले त्यांच्या सोबत अशोक जाधव, बाळासाहेब पवार,उद्धव जाधव ,अल्केश भोसीकर,आकाश चीलगर,गणेश चीलगर,आकाश जाधव, उद्धव काकटे, भागवत शिंदे यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले .या सोबतच भाविकांना बिस्कीट आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
या पुढे ही अशीच सेवा देऊ असा मानस डॉ.संभाजी पवार यांनी व्यक्त केला.

Previous articleसिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं एक हजार कोटीचं नुकसान : धर्मराज काडादी
Next articleकु.महेश्वरी प्रशांत बनबरे MHCET मध्ये 96.21 % गुण मिळवून घवघवीत यश मिळविले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here