राजेंद्र पाटील राऊत
कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सत्कार
महानगरप्रमुख श्रीरामभाऊ मिस्तरी
मालेगाव(प्रतिनिधी सतिश घेवरे युवा मराठा न्युज नेटवर्क)- दि. २३ मालेगांव शहरातील सामान्य रुग्णालय, सहारा हॉस्पीटल, म.स.गा. कोविड केंद्रांसह महिला व बाल रुग्णालय येथील डॉक्टर्स, नर्स, अधिपरिचारीका तसेच इतर सर्व आरोग्य सेवा देणारे कर्मचारी यांनी कोविड काळात दिलेली सेवा महत्वपुर्ण असुन मा. कृषिमंत्री दादाजी भुसे व पदाधिकारी यांच्या हस्ते कोविड सेंटर वरील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला.
तसेच पुढील काळात तमाम मालेगांवकरांच्या वतीने कोविड काळात सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी वर्गाचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी नमुद केले असल्याचे महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी यांनी सांगीतले.
सदर प्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाने, महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी, ज्येष्ठ नेते मनोहर बापु बच्छाव, उपमहापौर निलेश आहेर, युवासेना उपजिल्हाप्रमुख विनोद वाघ, मार्केट कमिटी सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, राजेश अलीझाड, प्रमोद पाटील, सुनिल सोनवणे, भाऊसाहेब जाधव, शरद कासार, भिकन आबा शेळके, राजेंद्र पवार, दत्ता चौधरी, अमोल चौधरी, नरेंद्र पवार, यांच्यासह कोविड सेंटरवरील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.