Home नांदेड तन्जीम ए-इंंन्साफ तालुकाध्यक्षपदी आसद बल्खी तर संघटकपदी आरिफ पठाण..

तन्जीम ए-इंंन्साफ तालुकाध्यक्षपदी आसद बल्खी तर संघटकपदी आरिफ पठाण..

181

राजेंद्र पाटील राऊत

तन्जीम ए-इंंन्साफ तालुकाध्यक्षपदी आसद बल्खी तर संघटकपदी आरिफ पठाण..

मुखेड तालुका प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी सामाजिक संघटना आॅल इंडिया तन्जीम -ए- इन्साफ च्या मुखेड तालुका व शहर कार्यकारिणी रविवार दि. २३ मे रोजी बल्खी नगर येथे जिल्हाध्यक्ष अब्दूल बशीर माजीद यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. जुबेर सर, जिल्हा उपाध्यक्ष आमेर अरसिल, मोईन कुरेशी, नांदेड शहराध्यक्ष हाफिज शाहेद उल इस्लाम, जिल्हा समन्वयक शेख रियाज, जिल्हा उपाध्यक्ष शेख बबलु मुल्ला, प्रसिद्धीप्रमुख मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषित करण्यात आली.
आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफ मुखेड तालुकाध्यक्षपदी आसद बल्खी, सचिव अॅड अस्लम शेख वडगावकर, शहराध्यक्ष ईमरान पठाण, शहर सचिव सय्यद नईम मुल्ला, तालुका कार्याध्यक्ष मौलाना युनुस तांबोळी, शहर कार्याध्यक्ष हाफिज माजीदसाब, तालुका समन्वयक महेताब शेख, शहर समन्वयक मिर्जा गौस बेग, तालुका उपाध्यक्ष सादिक तांबोळी, बाऱ्हाळीकर, उपाध्यक्ष मुनिर मुजावर जांब बु., संघटकपदी आरिफ पठाण धामणगावकर, कोषाध्यक्ष मुख्तारसेठ बेळीकर, सहसचिव मोतीपाशा पाळेकर, सहसंघटक खदीर बागवान सावरगावकर, सहकोषाध्यक्ष- गौस मणियार सावरगावकर, कायदेशीर सल्लागार अॅड. शफीभाई सय्यद, प्रसिद्धीप्रमुख शेख शाहरुख पैसमाळकर, सह शहर कार्यकारिणीत शहर उपाध्यक्ष हाफिज सरवरसाब, उपाध्यक्ष सय्यद सादीक पाशासाब , उपाध्यक्ष गफार भाई, संघटक- गौस पठाण फुलेनगर, कोषाध्यक्ष निजाम कुरेशी, सहसचिव निसार शेख, सहसंघटक समिर अत्तार, सह कोषाध्यक्ष इसाक मणियार सलगरकर, शहर प्रसिद्धप्रमुख शबीर बल्खी, शेख मोहसीन फुलेनगर, सदस्य ईलियास कादरी, युसुफ शहा, शब्बीर सौदागर, सय्यद सादीक मसालेवाले, हारुन होनवडजकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.