Home नांदेड धान्य मिळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात लाभधारकाचे बंड.

धान्य मिळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात लाभधारकाचे बंड.

143
0

राजेंद्र पाटील राऊत

धान्य मिळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात लाभधारकाचे बंड.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क))
मुखेड : कोरोनाच्या महामारीत गोरगरीब सामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वतीने नेहमी धान्य व मे,जून या दोन महिन्याचे धान्य पात्र लाभधारकांना मोफत देण्याचा एकमताने शासनाने निर्णय घेतला मात्र मुखेड तालुक्यातील मौ. कापरवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदाराने तहसीलदारांच्या आदेशाची पायमल्ली करत चक्क चार महिन्यापासून धान्य वाटप न केल्याने सामान्य गोरगरीब व पात्र लाभधारकावर उपासमारीची वेळ आली आहे.
मौ. कापरवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार नियमित धान्य उचल करतो पण मशीनला आपले अंगठे येत नाहीत म्हणून तुमचा मालही आला नाही म्हणून सामान्य लाभधारकांना प्रति महिन्याचे धान्य देत नाही. लाभधारकाच्या नावावर आलेले धान्य काळ्या बाजारात विक्री करत असताना अनेक वेळा लाभधारकांनी पकडून तहसिल प्रशासनाला कळवले मात्र दुकानदार व पुरवठा विभागाचे संगनमत असल्याने दुकानदाराच्या विरोधात लाभधारकांनी अनेक वेळा बंड केले तरी देखील पुरवठा विभागासोबत आर्थिक संगनमत असल्याने लाभधारकाचे बंड अनेक वेळा थंड झाल्याचे पाहायला मिळाले हे मात्र विशेष.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात केंद्र व राज्य शासनाने अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या विविध धान्य योजनेच्या माध्यमातून सामान्य व पात्र लाभधारकांना मोफत धान्य उपलब्ध कसून दिले पण स्वस्त धान्य दुकानदाराच्या हलगर्जीपणामुळे व तहसिल प्रशासनाच्या लाचखोर वृत्तीमुळे सामान्य लाभधारकांना वंचित राहावे लागत असल्याने ऐन लॉकडाऊन मध्ये सामान्य लाभधारकावर उपासमारीची वेळ आली आहे. हा सर्व प्रकार तहसिलदार यांच्या कक्षात कथन करूनही या कडे पुरवठा प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दुकानदाराला अभय दिले जात आहे त्यामुळे सदर स्वस्त धान्य दुकानदाराचा तात्काळ परवाना रद्द करून पर्यायी व्यवस्थेने जोडण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

1) स्वस्त धान्य दुकानदाराचा भोंगळ कारभार उघडकीस
2) पुरवठा प्रशासन मुग गिळून गप्प सामन्यांवर उपासमारीची वेळ.
3) स्वस्त धान्य दुकानदाराकडे अद्यावत कागदपत्रे उपलब्ध नाहीत.
4) कर्तव्य व जबाबदारीत कसूरकरून पाठीशी घालणे अयोग्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here