Home उतर महाराष्ट्र सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? सोनू शिंदेने केले तेरा लग्न,नवरदेवांना लुटूले...

सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? सोनू शिंदेने केले तेरा लग्न,नवरदेवांना लुटूले उभे केले विघ्न! उतर महाराष्ट्रात “सोनूचा”पैसे कमविण्याचा अजब धंदा…

498
0

राजेंद्र पाटील राऊत

सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?
सोनू शिंदेने केले तेरा लग्न,नवरदेवांना लुटूले उभे केले विघ्न!
उतर महाराष्ट्रात “सोनूचा”पैसे कमविण्याचा अजब धंदा…
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज नेटवर्क)
नंदुरबार, दि. २२- गेल्या काही दिवसापुर्वी सोनू ,तुझा माझ्यावर भरोसा नाय का?हे गाणे चांगलेच गाजले होते.अशाच एका सोनूने मात्र उतर महाराष्ट्रात मोठ्ठाच धुमाकूळ घालून तब्बल १३ नवरदेव मुलांना चांगलाच घाम फोडला आहे.सोनू शिंदे नावाच्या या मुलीने उतर महाराष्ट्रातील एक नव्हे दोन नव्हे तर तेरा मुलांशी लग्न करुन त्यांना फसविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.या सोनूने तब्बल तेरा मुलांशी लग्न करुन त्यांना लुटलं व नंतर पळून गेली.यामागे सोनू एकटी नसून,तिच्यामागे मोठ्ठी टोळीच असल्याचं समोर आले आहे.
▪️ कोण आहे सोनू शिंदे?
सोनू शिंदे हिची टोळी खरे तर विदर्भातील हिंगोली व अकोला जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.अविवाहित विवाह इच्छूक तरुणांसोबत लग्न जमविण्यासाठी हि टोळी वेगवेगळ्या शहरांमधील दलालांच्या मदतीने सोनूचे लग्न लावून द्यायचे.यावेळी त्यांनी नंदुरबारच्या एका कुटूंबाला फसवलं.याकामी या टोळीला औरंगाबादच्या एका दलालाने मदत केल्याचे उघड झाले आहे.याबाबतीत सविस्तर पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की,गेल्या दोन आठवडयापुर्वी सोनू शिंदे या तरुणीचे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या मंदाणे गावातील तरुणांशी लग्न केले.नवीन लग्न झाल्याच्या खुषीत असलेल्या नवरदेव मुलाकडून लाखो रुपये उपटल्यानंतर दलाल टोळी परतत नाही,तोवर नवी नवरी सोनू शिंदेने या नवरदेव तरुणाला गुंगारा देऊन तेथून पळ काढला.सोनू अखेर नांदलीच नाही.सोनू पसार झाली.
▪️पोलिसात केली तक्रार दाखल
नव्यानेच लग्न झालेली नवी नवरी पसार झाल्याने संबंधित कुटूंबाला मोठाच हादरा बसला .आपण फसवलो गेलो याची त्यांना जाणीव झाली त्यामुळे त्यांनी ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल केली.पोलिसांनी घटनेचे गांभिर्य बघून तात्काळ गुन्हा नोंद करुन तपासाला सुरुवात केली.पोलिसांचा तपास सुरु असतानाच मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सोनू शिंदे हि आता शिंदखेडा तालुक्यातल्या एका तरुणाशी गुपचूपपणे तेरावे लग्न करीत असल्याची हि माहिती प्राप्त होताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.मात्र पोलिस आपल्या मागावर असल्याचा सुगावा या टोळीला लागल्याने त्यांनी आपले लग्नाचे ठिकाण बदलून अमळनेर तालुक्यातल्या एका खेडयात हे लग्न उरकून टाकण्याची तयारी सुरु केली.मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी लग्न मंडपातूनच वधू सोनू शिंदेला अटक केली आहे.तर सोनू शिंदेचा भाऊ व आई पळून जाण्यात व्यशस्वी झाले पोलिस त्यांच्याही मागावर आहेत.सोनू शिंदे टोळीने आतापर्यंत धुळे,नंदुरबार,जळगांव जिल्ह्यात जिल्ह्यातील अनेकांकडून लग्नाच्या नावाखाली कोटयावधी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड होत आहे.

Previous articleपेठ गावात वीजेचा शाॅक लागून तरुणाचा मृत्यू
Next articleधान्य मिळत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदाराच्या विरोधात लाभधारकाचे बंड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here