Home Breaking News पेठ गावात वीजेचा शाॅक लागून तरुणाचा मृत्यू

पेठ गावात वीजेचा शाॅक लागून तरुणाचा मृत्यू

517
0

 

 

पेठ ता. वाळवा येथील वंचित बहुजन पक्षाचा तालुकाध्यक्ष विशाल राजेंद्र कुरणे (वय-२९) रा. भिमनगर, पेठ ता. वाळवा
याचा पिण्याच्या पाण्यासाठी मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची सुरेश दिलीप कुरणे रा. भिमनगर, पेठ यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की पेठ गावात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पाणी दर तिसऱ्या-चौथ्या दिवशी येत असते. कमी प्रेशरने पाणी पुरवठा होत असल्याने सर्वजण नळाला विद्युत पंप जोडून पाणी भरत असतात. नेहमीप्रमाणे आज चौथ्या दिवशी पाणी आल्याने विशाल कुरणे हा पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेला. मोटर जोडताना त्याला विजेचा जोराचा धक्का बसल्याने तो जागेवरच कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तेथील वैद्यकीय यंत्रणेलने तपासणी करून त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, ३ वर्षाची मुलगी व १ वर्षाचा मुलगा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here