Home Breaking News देव तारी त्याला कोण मारी सलग १९ तास पोहून ‘तौक्ते’ चक्रीवादळाला हरविले

देव तारी त्याला कोण मारी सलग १९ तास पोहून ‘तौक्ते’ चक्रीवादळाला हरविले

260
0

नेर्ले : अरबी समुद्रामध्ये झालेल्या तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या बार्ज पी-३०५ या जहाजावरील ३०० कामगारापैकी भारतीय नौदलाने आतापर्यंत १८८ जणांची सुखरूप सुटका केली आहे. तर आतापर्यंत ६० कामगारांचा मृत्यू झाला असून अजून काही बेपत्ता आहेत. याच जहाजावर काळमवाडी ता. वाळवा येथील निखिल कैलास सुपनेकर हा तरुण सात महिन्यांपासून टँकर वेल्डर म्हणून कार्यरत आहे. चक्रीवादळामुळे अँकर तुटून बोट क्रॅक झाल्याने बोटीत पाणी शिरले परंतु दिवसभर वादळ कमी होण्याची वाट बघत सर्वजण बोट पकडून उभे होते. १७ मे सायंकाळी पाचच्या दरम्यान बोट बुडण्यास सुरूवात झाली. ज्यांना पोहता येत होते, त्यांनी लाईफ जॅकेट घालून उड्या मारल्या तर काही जण बोटीबरोबर पाण्यात बुडाले. मात्र या उडी मारण्यामध्ये निखिल सुपनेकर हा २५ वर्षीय युवक देखील होता.
चक्रीवादळामुळे समुद्रात प्रती सेकंद होणाऱ्या ३६ फुट उंच लाटा, ताशी १८० वेगाने वाहणारे वारे, विजांचा कडकडाट, धुवाधार पाऊस व गडद काळोख अशा प्रतिकूल परिस्थितीशी निखिल सलग १९ तास पाण्यात झुंज देत होता. दि. १८ मे रोजी दुपारी एक च्या दरम्यान भारतीय नौदलाने हेलिकॉप्टरमधून त्याला पाहिले व गुजरातच्या सिमेवरील रेस्क्यू बोटच्या गरम रूममध्ये अठरा तास ठेवण्यात आले त्यानंतर १८ मे रोजी रात्रभर मुंबईतील एका रुग्णालयात ठेऊन शुक्रवारी दि. २१ रोजी काळामवाडी येथील त्याच्या घरी सोडले.
सामान्य कुटुंबातील असणाऱ्या निखिलने आयटीआयमधून वेल्डरचा कोर्स केला होता. त्याला सात महिण्यापुर्वी मुंबई मधील मॅथ्यू अस्फोटेक या कंपनीमध्ये वेल्डर या पदावर काम मिळाले होते. घरी आई, वडील, एक भाऊ व लहान बहिण असा परिवार आहे. गावी सुखरूप पोहचल्या नंतर सरपंच व ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले.

Previous articleकेंद्र सरकारने खताच्या भावात केलेल्या भाववाढीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने थाळी बजाव आंदोलन.
Next articleपेठ गावात वीजेचा शाॅक लागून तरुणाचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here