Home नाशिक आताची मोठ्ठी बातमी! देवळा. उमराणे गावात पकडलेल्या ट्रक मधून रेशनचा गहू व...

आताची मोठ्ठी बातमी! देवळा. उमराणे गावात पकडलेल्या ट्रक मधून रेशनचा गहू व तांदूळ जप्त

232
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230616-120730_WhatsApp.jpg

आताची मोठ्ठी बातमी! देवळा. उमराणे गावात पकडलेल्या ट्रक मधून रेशनचा गहू व तांदूळ जप्त

प्रतिनिधी. प्रवीण अहिरराव युवा मराठा न्यूज

डॅशिंग अधिकारी, नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार विशेष पथकाने देवळा पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून रात्री 11 वाजता उमराणे शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 जवळ यु.पी प्रतापगड ढाब्यासमोर पटांगणात उभे असलेल्या एमएच 12 एफ सी 58 44 क्रमांकच्या ट्रकला ताब्यात घेतले असता त्यात 3 लाख 60 हजार रुपये किमतीचे 246 गोणी ,कट्टे 50 किलो प्रत्येकी, तांदूळ निळ्या शाहीने महाराष्ट्र शासनाचा शिक्का असे गोणीवर लिहिलेले . 37 हजार 500 रुपये किमतीच्या सुमारे 30 गोण्या गहू व 8 लाख रुपये किमतीचा मालट्रक असा एकूण 11 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . काळ्या बाजारात हा रेशनचा तांदूळ व गहू विकण्याचा कट पोलिसांच्या या कामगिरीमुळे उधळला गेला
ज्योती ज्ञानेश्वर कपाले पुरवठा निरीक्षक नेमणूक तहसील कार्यालय देवळा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, विजय देवरे राहणार उमराणे मनमाड रोड तालुका देवळा ,व योगेश माणिक भामरे राहणार खुंटेवाडी ट्रक ड्रायव्हर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा माल नेमका कोठे विकण्यासाठी जाणार होता याबाबत पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे व त्यांचे सहकारी तपास करत आहेत .

Previous articleसटाणा येथे यशवंत सेनेच्या वतीने पशुसंवर्धन अधिकारी यांचा सत्कार
Next articleदहिवड येथे शेततळ्यात आंघोळ करताना एकाचा बुडून मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here