Home नाशिक दहिवड येथे शेततळ्यात आंघोळ करताना एकाचा बुडून मृत्यू

दहिवड येथे शेततळ्यात आंघोळ करताना एकाचा बुडून मृत्यू

157
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230616-130540_WhatsApp.jpg

दहिवड येथे शेततळ्यात आंघोळ करताना एकाचा बुडून मृत्यू

प्रतिनिधी. प्रवीण अहिरराव युवा मराठा न्यूज

देवळा तालुक्यातील दहिवड येथे गुरुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास नंदू निंबाजी जाधव नागिन मळा दहिवड यांच्या शेतात काम करत असलेला शेतमजूर निंबा खंडू सोनवणे वय वर्ष 42 हा दुपारी शेततळ्यात आंघोळ करायला गेला असता पोहताना दम लागून आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
शेततळ्यात भरपूर पाणी असल्याने सदर तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी स्थानिकांनी जवळपास 4 तास प्रयत्न करून देखील मृतदेह मिळाला नाही, शेवटी मालेगाव येथील अग्निशामक दलाच्या शकील अहमद, रवींद्र शेजवळ, शुभम पाटील, शाकीर हाजी, जीवन महिरे यांना बोलावून 2 तासाच्या
अथक प्रयत्नानंतर सदर मृतदेह सापडविण्यात यश आले , पुढील तपास देवळा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here