Home अमरावती अमरावती सह विदर्भातील उर्वरित नऊ जिल्ह्यांना काँक्रेटरी रस्त्यात ठेंगा तर काँक्रीट रस्त्या...

अमरावती सह विदर्भातील उर्वरित नऊ जिल्ह्यांना काँक्रेटरी रस्त्यात ठेंगा तर काँक्रीट रस्त्या करिता नागपूरला एक हजार कोटी.डाॅ. सुनील देशमुख यांचा सवाल.

188

आशाताई बच्छाव

Screenshot_20230616-145844_WhatsApp.jpg

अमरावती सह विदर्भातील उर्वरित नऊ जिल्ह्यांना काँक्रेटरी रस्त्यात ठेंगा तर काँक्रीट रस्त्या करिता नागपूरला एक हजार कोटी.डाॅ. सुनील देशमुख यांचा सवाल.
दैनिक युवा मराठा वृत्त संकलन
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
विदर्भाच्या विकासाचा नावावर अमरावती शहराचा विदर्भातील उर्वरित नऊ जिल्ह्याची सुरू असलेली घोर अपेक्षा ही अत्यंत वेदनादायी असून आता नव्याने राज्य शासनाने काँक्रीट रस्ते बांधण्याच्या निधीमध्ये नागपूर शहरा करता एक हजार कोटी निधी दिली आहे. राज्य शासनाने अमरावती शहराचा विदर्भातील नऊ जिल्ह्यावर केलेल्या अन्यायाची तर परीसीमा गाठली आहे. गेल्या आठ वर्षात नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पावर तब्बल एक लाख दहा हजार कोटी रुपये पेक्षा जास्त निधीची विविध विकास कामे यादी प्रगतीपथावर आहे असा दावा अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी गुरुवारी जारि केलेल्या एका प्रसिद्ध पत्रकार केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री कथा वित्तमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या या रस्त्यासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. गेल्याच महिन्यात हा निधी मंजूर करण्यात आला असून त्यातील तीनशे कोटीच्या पहिल्या टप्प्यातील निधी महानगरपालिका ला अदा करण्यात आल्या चे सुद्धा नमूद केलेले आहे. या रस्त्याच्या सिमेंट करना चा खर्च 1000 कोटीच्या वर गेल्यास यातील काही रस्त्यांचा समावेश पुढील टप्प्यात करण्यात येईल हे सुद्धा नमूद केले आहे. असे असताना अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील काही मुख्य रस्ते आणि मोठ्या नगरी वस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत मुख्य रस्त्याचे अक्षरशः चाळन झालेली आहे. अमरावती महानगरपालिकेला एक”छदाम”सुद्धा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाकरता देण्यात आलेले नाही. शहरातील कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा सरकारा सहभागी असलेल्या पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी अमरावती शहरा रस्त्याचा करिता अशा आशयाची मागणी केल्याचे दिसून येत नाही. असे डॉ. सुनील देशमुख यांनी म्हटले आहे.

Previous articleदहिवड येथे शेततळ्यात आंघोळ करताना एकाचा बुडून मृत्यू
Next articleदहिवड येथील एका शेतकरी कुटुंबातील भूषण सोनवणे ची इंडियन नेव्ही s.s.r या पोस्टसाठी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.