Home नाशिक दहिवड येथील एका शेतकरी कुटुंबातील भूषण सोनवणे ची इंडियन नेव्ही s.s.r या...

दहिवड येथील एका शेतकरी कुटुंबातील भूषण सोनवणे ची इंडियन नेव्ही s.s.r या पोस्टसाठी निवड

120
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230616-155106_WhatsApp.jpg

दहिवड येथील एका शेतकरी कुटुंबातील भूषण सोनवणे ची इंडियन नेव्ही s.s.r या पोस्टसाठी निवड

प्रतिनिधी .प्रवीण अहिरराव युवा मराठा न्यूज

देवळा तालुक्यातील दहिवड येथील रामनगर शिवारात राहणाऱ्या सुभाष पठाण सोनवणे यांचे नातू भूषण समाधान सोनवणे वय 19 याचे प्राथमिक शिक्षण दहिवड येथील भवरी येथील जिल्हा परिषद शाळा येथे झाले. व 5 वी 10 पर्यंतचे शिक्षण दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालय दहिवड येथे झाले. त्याने 11 वि 12 शिक्षण येवला येथे केले, त्यानंतर नाशिक येथील गरुड झेप अकॅडमी येथे प्रशिक्षण घेतले . व मेहनतीच्या जोरावर अभ्यासुवृत्ती जोपासत या मुलाची निवड इंडियन नेव्ही मध्ये झाली.
भूषण नुकताच दहिवड येथून लखनऊ येथे प्रशिक्षणासाठी गेला आहे मला माझे गुरुवर्य श्री मुरलीधर भांबरे सर व जिजामाता माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले , तसेच आमच्या गरुड झेप मधील सर्वोच्च स्पोर्ट शिक्षकांनी व आमच्या शाखेचे लक्ष्मण डोळस, व शाखाप्रमुख गाढे सरांनी मला घडवलं आणि आज मी या पाऊलापर्यंत पोहोचलो माझ्या या यशाच्या पायरीवर माझ्या परिवाराने खंबीर साथ दिली . माझ्या वडिलांनी मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही म्हणून मी आज या क्षणाचा आनंद आहे असे भूषण ने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here