Home मुंबई मुंबई पूर्व उपनगरात गॅस गळतीमुळं दुर्गंधी, महापालिकेकडे अनेक तक्रारी, नागरिकांमध्ये भीती

मुंबई पूर्व उपनगरात गॅस गळतीमुळं दुर्गंधी, महापालिकेकडे अनेक तक्रारी, नागरिकांमध्ये भीती

137
0

🛑 मुंबई पूर्व उपनगरात गॅस गळतीमुळं दुर्गंधी, महापालिकेकडे अनेक तक्रारी, नागरिकांमध्ये भीती 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 7 जून : ⭕मुंबईच्या पूर्व उपनगरात काल रात्री मोठ्या प्रमाणत गॅसची दुर्गंधी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात तक्रारी अग्निशमन दलाला आल्या होत्या. अनेकांनी समाज माध्यमातून देखील वायू गळतीची शक्यता वर्तवली होती. या अनुषंगानं अग्निशमन दलाने रात्रभर याचा विविध ठिकाणी शोध घेतला.त्याच बरोबर दक्षता म्हणून ज्या ठिकाणावरून तक्रारी आल्या होत्या तिथे जाऊन दक्षतेबाबत घोषणा करण्यात आल्या. गोवंडी मधील एका औषध कंपनी मधून हा गॅस लिकेज झाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली होती. तशी लेखी तक्रार ही केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी इथे देखील जाऊन रात्री पाहणी केली. दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं आणि घाबरुन न जाण्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, मुंबईच्या काही भागात पसरलेल्या दुर्गंधीसंदर्भात, आतापर्यंत मुंबई फायर ब्रिगेडने स्टॅंडर्ड कार्यप्रणाली नुसार काम सुरू केले आहे. त्यांनी सांगितलं आहे की, कोणीही घाबरू नका, मी सर्वांना घरातच राहण्याचे आवाहन करतो. घराच्या खिडक्या बंद करा. मुंबई महापालिका या परिस्थितीवर नजर ठेवून आहे, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, अग्निशमन विभाग याचा शोध घेत आहे, लिकेजचा मूळ स्त्रोत सापडताच कळवलं जाईल, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे हे यासंदर्भातील प्रत्येक अपडेटवर नजर ठेवून आहेत. त्यांनी रात्री 11.50 ते 2.30 वाजेपर्यंत ट्वीट करत या घडामोडींबाबत माहिती दिली आहे.

माहितीनुसार, मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, पवई आदी विभागात रात्री पावणे बारा – बाराच्या सुमारास गॅस गळतीचा वास येऊ लागला होता. गॅसचा उग्र वास येत असल्याने या विभागांमधून मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाकडे गॅस गळतीच्या तक्रारी नागरिकांनी ट्विटरच्या माध्यमातून नोंदवल्या. गॅस गळतीच्या अनेक तक्रारी येऊ लागल्याने मुंबई अग्निशमन दलाने आपल्या अनेक गाड्या पाठवत गॅस लिकेजचा शोध घेतला.

चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि पवई येथील रहिवाशांकडून गॅस गळती होण्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. अग्निशमन दल याबाबत माहिती घेत आहे. आम्ही लवकरच याबाबत माहिती देऊ, असं मुंबई महापालिकेनं सांगितलं आहे.

गॅस गळतीची तक्रार आलेल्या भागात अग्निशमन दलाकडून नागरिकांनी भिऊन न जाता ओला कपडा किंवा ओला रुमाल तोंडाला आणि नाकाला बांधण्याचे तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन महापालिकेकडून केले गेले आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी भिऊन जाऊ नये असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे. दरम्यान गॅस गळती कुठे झाली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. त्याचा शोध सर्व यंत्रणांकडून घेतला जात आहे, असं देखील सांगण्यात येत आहे.⭕

Previous articleचांदवड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दहावर*
Next article30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here