• Home
  • 30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

🛑 30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 7 जून : ⭕ कोरोनामुळे 72 दिवस लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि बँक-आधार आणि इतर व्यवहारांसंबधित कामांसाठी केंद्र सरकारकडून नागरिकांना मुदत वाढवून देण्यात आली होती. 1 जूनपासून टप्प्या टप्प्यानं लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर आता एका महिन्यात आपल्याला ही महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागणार आहेत. 7 कामं पूर्ण न केल्यास मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. केंद्र सरकारनं बँकेशी संबंधित व्यवहारांच्या काही अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत.

➡️ आधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 30 जून ही अंतिम मुदत असेल. त्यानंतर आधार-पॅन लिंक कऱण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. आधार-पॅन लिंक न केल्यास तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नसल्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

➡️ 2019-2020 आर्थिक वर्षामध्ये तुम्ही कर वाचवण्यासाठी बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली नसेल तर ती 30 जूनपर्यंत करण्याची मदत आहे. 30 मार्च 2020 पर्यंत ही मुदत देण्यात आली होती मात्र आता ती वाढवून 30 जून करण्यात आली आहे.

➡️ 2018-2019 आर्थिक वर्षातील ज्या व्यक्तींनी ITR अद्यापही भरला नाही त्यांच्यासाठी 30 जूनपर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.

➡️ सरकारने काढलेल्या अध्यादेशाद्वारे फॉर्म -16 (पगारापासून वजा केलेल्या टीडीएसचे प्रमाणपत्र) जारी करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. फॉर्म नंबर 16 च्या मदतीनं तुम्ही ITR दाखल करू शकता. ही मुदत केवळ 30 जूनपर्यंत असणार आहे.

➡️ जर आपण किमान वार्षिक ठेव किंवा कोणतेही लहान बचत योजना खाते किंवा पीपीएफ खाते उघडले असेल तर अंतिम तारखेला रक्कम न भरल्यास आता दंड भरावा लागणार आहे. शकतो. सध्या पीपीएफ व सुकन्या समृद्धि योजना खात्यात किमान रक्कम जमा न करण्याचा आकारण्यात येत आहे. एप्रिल आणि मे महिन्याचे तुमचे पैसे जमा करण्याचे राहिले असतील तर ते 30 जूनपर्यंत खात्यात जमा करावेत. त्यावर कोणताही दंड आकारण्यात येणार नाही. 30 जूननंतर मात्र दंड आकारला जाणार आहे.

➡️ तुमचं पीपीएफ अकाऊंट मॅच्युअर झालं असेल आणि तुम्ही त्याची मुदत वाढवणार असाल आणि अद्यापही वाढवली नसेल तर ही मुदत 30 जूनपर्यंत देण्यात आली आहे. मुदत वाढवल्याचा फॉर्म जमा करण्याची अंतिम मुदत 30 जून असणार आहे.

➡️ ज्येष्ठ नागरिक योजनेच्या खात्यात गुंतवणूक करण्यासाठी सरकारने सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या गुंतवणूकीची अंतिम तारीख 30 जून 2020 पर्यंत वाढविली आहे. योजनेच्या नियमांनुसार सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर 55-60 वर्षे वयोगटातील सेवानिवृत्त व्यक्ती एका महिन्यासाठी एससीएसएस योजनेत गुंतवणूक करू शकतात.⭕

anews Banner

Leave A Comment