Home Breaking News जळगावत कोरोनाची दहशत सुरूच!

जळगावत कोरोनाची दहशत सुरूच!

141
0

🛑 जळगावत कोरोनाची दहशत सुरूच! 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जळगाव :⭕ जळगाव जिल्ह्यात आज नवीन 44 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णाची संख्या आता 1001 इतकी झाली आहे. आतापर्यंत 113 मृत्यू व 429 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार हा जिल्ह्यात वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची वाढती आकडेवारी ही चिंताजनक बनत आहे. जळगाव व भुसावळ शहरांनी 200 च्या वर रुग्ण संख्येचा आकडा पार केला आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 83 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जळगाव जिल्ह्याची कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली होती.
त्यात त्यांनी पुढील निर्देश जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. ‘जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने टास्क फोर्स गठित करुन त्यांचा सल्ला व औषधोपचार घ्यावेत. तसेच कोरोना विषाणूचा तपासणी अहवाल 24 तासांत प्राप्त होईल, असे नियोजन करावे,’ असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.⭕

Previous article30 जूनच्या आधी पूर्ण करा ही 7 कामं, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
Next articleस्वस्तात सोने खरेदी करण्याची ८ जूनला संधी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here