• Home
  • स्वस्तात सोने खरेदी करण्याची ८ जूनला संधी

स्वस्तात सोने खरेदी करण्याची ८ जूनला संधी

🛑 स्वस्तात सोने खरेदी करण्याची ८ जूनला संधी 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ बाजारभावापेक्षा कमी दारात सोने खरेदीची संधी आता चालून आली आहे. सध्या बाजारात सोन्याचे भाव ४७,५०० रुपये/१० ग्राम असा असतानाच त्यापेक्षा कमी दराने सोने खरेदी करण्याची संधी ८ tw १२ जून या कालावधीत उपलब्ध आहे.

होय, सॉवरेन गोल्ड बॉन्ड (एसजीबी) अर्थात Sovereign gold bond scheme 2020-21 यामध्ये आपण ४ हजार ७७ प्रति ग्राम या रेटमध्ये सोने खरेदी करू शकता. त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) वरून किंवा काही व्यावसायिक बँक, भारतीय स्टॉक होल्डिंग निगम लिमिटेड (एसएचसीआईएल) आणि पोस्ट कार्यालयातून याची खरेदी करणे शक्य आहे. तसेच यावर सरकार २.५ टक्के व्याज देणार आहे. एकजण यामध्ये किमान १ ग्राम किंवा जास्तीतजास्त ५०० ग्राम सोने खरेदी करून शकतात.
तसेच केंव्हाही याची बाजारभावानुसार विक्री करण्याचीही सोय आहे.⭕

anews Banner

Leave A Comment