Home Breaking News सावधान ! टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वात मोठा धोका

सावधान ! टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वात मोठा धोका

204

🛑 सावधान ! टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वात मोठा धोका 🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

न्यूयॉर्क :⭕ टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोनाव्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, असा दावा एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीत केलेल्या या अभ्यासाचे प्रमुख संशोधक प्रोफेसर कार्लोस वॅम्बीयर यांच्या म्हणण्यानुसार, “पुरुषांमधील टक्कल हे कोव्हिड-19 च्या (COVID-19) गंभीर संसर्गासाठी धोकादायक घटक आहे”. जानेवारीत चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अशा प्रकारच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरोनामुळं मृत्यू होण्याचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा जास्त आहे.

मेट्रो न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणू आणि टक्कल पडण्यातील संबंध समजून घेण्यासाठी दोन अभ्यास करण्यात आले आहे.
स्पेनमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, 41 कोरोना रूग्णांवरील संशोधनात असे दिसून आलं आहे की त्यापैकी 71 टक्क्यांहून अधिक पुरुषांना टक्कल होते. ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, 122 कोरोना रूग्णांवर संशोधन केलं गेलं होतं, त्यातील 79 टक्के रुग्णांना टक्कल असल्याचं निष्पण्ण झालं.
संशोधकांच्या मते टक्कल पडणं आणि कोरोनाचा संसर्ग यांच्यात एक विशेष संबंध आहे. संशोधकांचा असा दावा आहे की पुरुषांच्या सेक्स हार्मोन एंड्रोजनमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची क्षमता वाढू शकते. अशा हार्मोनमुळे पुरुषांमध्ये औषधांचा प्रभाव कमी होत आहे आणि रुग्ण गंभीर आजारी पडतात.⭕

Previous articleस्वस्तात सोने खरेदी करण्याची ८ जूनला संधी
Next articleठाणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.