• Home
  • ठाणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

ठाणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

🛑 ठाणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक🛑
✍️( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे :⭕कोरोना पार्श्वभूमीवर ठाण्यातील जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मस्योउद्योग मंत्री व ठाणे जिल्हा संपर्क मंत्री असलम शेख हे ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात आले होते या प्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल नार्वेकर यांच्याकडून सरकारने कोरोना संसर्ग ला आळा बसण्याची केलेल्या विविध उपाययोजना कशाप्रकारे राबविण्यात येत आहेत यांची माहिती घेतली याप्रसंगी त्यांच्या समवेत ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे,प्रदेश पदाधिकारी राजेश जाधव,सुखदेव घोलप,जे.बी.यादव,जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे,महिला काँग्रेस अध्यक्षा शिल्पा सोनोने,जिल्हा सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, विजय बनसोडे,ब्लाॅक अध्यक्ष संदिप शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे यांनी रूग्णालयातील काही महत्त्वाच्या विषयांवर बोलताना सद्यस्थितीत कोविड करिता नियोजित केलेल्या रूग्णालयात कीती बेड उपलब्ध आहेत यांची सविस्तर माहिती नसल्याने रूग्णाच्या नातेवाईकांचे खूप हाल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता येत्या दोन दिवसातच याकरिता व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार असल्याचे ना.असलम शेख यानी सांगितले सदर प्रसंगी बोलताना त्यांनी हेही सांगितले की सरसकट सगळेच छोटे मोठ्या आजाराच्या तक्रारी असताना कोविड टेस्ट करण्यासाठी आग्रह करण्यात येत आहे कोविड टेस्ट ची उपलब्धता बघता हे शक्य होत नाहीये त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विविध ठीकाणी छोट्या मोठ्या आजाराच्या तक्रारीकरिता वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या ठीकाणी सर्वप्रथम नागरिकांनी उपचार घ्यावेत या वैद्यकिय अधिका-यानी एखाद्या रूग्णाला कोविड तपासणी करावी की नाही यांच्या निर्णयानतरच कोविड तपासणी करण्यात येणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment