• Home
  • चांदवड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दहावर*

चांदवड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दहावर*

*चांदवड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दहावर*
चांदवड(प्रविण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-चांदवड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता दहा झाली आहे. चांदवड तालुक्यात पहिली संख्या फक्त दोन होती.
चांदवड तालुक्यातील दहेगाव मनमाड येथील पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील 8 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते तसेच नासिक येथे रुग्णासोबत गेलेल्या एका महिलेचा सुद्धा swab नाशिक येथे घेण्यात आला होता.
त्यापैकी आज एकूण 4 व्यक्तींचे (सर्व महिला) यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत पैकी 3 DCHC चांदवड येथे उपचारासाठी भरती आहेत व 1 महिला मूळ रुग्णासोबत नासिक येथे उपचारार्थ भरती आहे उर्वरित 5 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत पॉझिटिव्ह आलेले अहवाल हे मूळ रुग्णाचे क्लोज कॉन्टॅक्ट मधील आहेत.
त्यामुळे चांदवड तालुक्यातील नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तर येवला तालुक्यातही काल 3 जणांचे अहवाल ह कोरोना बाधित आढळून आले आहे.

anews Banner

Leave A Comment