Home नाशिक पंढरपूर देवस्थानच्या स्वच्छतेकडे तात्काळ लक्ष घालण्याची गरज

पंढरपूर देवस्थानच्या स्वच्छतेकडे तात्काळ लक्ष घालण्याची गरज

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20230521-WA0027.jpg

पंढरपूर देवस्थानच्या स्वच्छतेकडे तात्काळ लक्ष घालण्याची गरज

मुंबई हायकोर्ट वकील ॲड प्रकाश पाटील (खेरवाडी) यांचे पंढरपूर देवस्थान कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र-

दैनिक युवा मराठा
निफाड (रामभाऊ आवारे)

पांडुरंग परमात्म्याच्या पवित्र पावन पंढरपूर भूमीमध्ये लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागा तीरावरील पुंडलिक मंदिर परिसर व विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात वाढलेल्या घाणीच्या साम्राज्याकडे पंढरपूर देवस्थान समितीने लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करण्याविषयीचे पत्र नीलांजनम बहुउद्देशीय ट्रस्ट खेरवाडी ता. निफाड चे अध्यक्ष तथा मुंबई हायकोर्टाचे वकील ॲड प्रकाश देवचंद पाटील यांनी नुकतेच विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
सदर पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मागील महिन्यात पाटील यांनी ट्रस्टच्या वतीने ५० भाविकांना घडविलेल्या मोफत पंढरपूर- तुळजापूर यात्रा दरम्यानच्या काळात दुपारच्या वेळेस चंद्रभागेत स्नानासाठी गेले असता ४० ते ५० म्हशींना धुण्याचे काम सुरू असल्याने नदीतील पाणी शेणामुळे अतिशय गढूळ पाणी होते. तसेच किनाऱ्यावरती शेण ,कचरा प्लास्टिक अस्तव्यस्त पडल्याने व म्हशींचे मोकाट उदळणे सुरू असल्याने भाविकांना घाबरून वस्त्रांतरासाठी दूरवर जावे लागते. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, दर्शन रांग, स्नान परिसर व विशेषता चंद्रभागा तीरावरील पुंडलिक मंदिर परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते असे त्यांनी पत्रात कथित केले आहे. या पत्राची माहितीसाठी प्रत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य जिल्हा न्यायाधीश सोलापूर, आदींना पाठविले आहे. तरी या पत्राची दखल घेऊन स्थानिक प्रशासन व देवस्थान समितीने कायमस्वरूपी स्वच्छता ठेवण्याची विनंती पाटील यांनी केली आहे.

Previous articleधनगर समाजाचे भाऊसाहेब ओहळ यांना उर्जावान युवा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान —
Next articleग्रामपंचायत उमर्टी येथे लाखों रुपयांचा घोटाळा उघडकीस..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here