आशाताई बच्छाव
धनगर समाजाचे भाऊसाहेब ओहळ यांना उर्जावान युवा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान —
दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे
धनगर समाजाचे नासिक जिल्हाध्यक्ष तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक भाऊसाहेब ओहळ यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल इंदौर येथील गजानन मंदिर येथे शनिदेव जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात गजासीन शनिदांच्या वतीने महामंडलेश्वर परमपूज्य दादू महाराज यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ रुद्राक्ष माळा व अकराशे रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
इंदौर (मध्यप्रदेश) येथे गजासीन शनि धाम मंदिर येथे आयोजित शनि देव जन्म उत्सव सोहळ्या प्रसंगी महाराष्ट्रातील नाशिक,अ.नगर,धुळे जिल्हातील समाजसेवकांना सामाजिक क्षेत्रातील
भरीव योगदानाबद्दल गजासीन शनि धाम च्या वतीने महामंडलेश्वर प.पु. दादु महाराज यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातुन सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट संघटन ,दांडगा जन-संपर्क, युवानेतुत्व ह्या माध्यमातुन सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामगिरी ची दखल घेत गजासीन शनि धाम ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने प.पु महामंडलेश्वर श्री दादु महाराज यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विश्वविद्यापीठाच्या कुलपती सौ डॉ अरूणा जैन यांच्या विशेष उपस्थितीत इंदौर नगर निगम चे सम्मानित सर्व सदस्य, इंदौर पो स्टेशनचे पो निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत, पुण्यश्लोक बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा धनगर समाजाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब ओहळ याना उर्जावान युवा सामाजिक पुरस्कार देउन सम्मानित करण्यात आले. प पु महामंडलेश्वर श्री दादु महाराज यांनी सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल,श्री फळ,रुद्राक्ष माला, 1100 रू देऊन सम्मानित करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा व आर्शिवाद दिले, अ.नगर जिल्हातुन कोपरगांव तालुक्याचे नामदेव मुरलीधर काकडे याना प पु महा मंडलेश्वर श्री दादु महाराज यांच्या हस्ते जेष्ठ सामाजिक पुरस्कार देउन सम्मानित करण्यात आले.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच्या विचाराचा वारसा जपुन ,तो सर्व सामान्यांपर्यत पोहचवण्याबरोबर त्याच्या विचारानुसार करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेउन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मभुमीतच आणि महामंडलेश्वर प पु दादु महाराज यांच्या पविञ हस्ते मिळालेल्या ह्या पुरस्काराचे अन्यन साधारण महत्व असुन,हा माझ्यासाठी आनंदाचा अभिमानाचा,प्रेरणादायी,तसेच अविस्मरणीय क्षण असुन, ह्या उर्जावान सामाजिक युवा पुरस्काराने सामाजिक कामाची जबाबदारी निश्चीतच वाढली असुन, ती जबाबदारी प्रामाणिक पणे करण्याचा प्रयत्न माझ्या शेवटच्या श्वासापर्यत असेल आणि तो मी करेन असे आपल्या मनोगतातुन व्यक्त करत गजासीन शनि धाम च्या सर्व पदाधिकारी, आयोजक, संयोजकाचे आभार मानले.






