Home गुन्हेगारी तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे एसीबीच्या...

तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे एसीबीच्या जाळ्यात

97
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230515-224105_WhatsApp.jpg

तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे एसीबीच्या जाळ्यात

भास्कर देवरे, युवा मराठा उपसंपादक

नाशिक – नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जवळपास दररोज एक लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडत आहे. आज मात्र, विभागाने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळेच मोठा मासा एसीबीच्या गळाला लागला आहे. तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना नाशिकचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याच्यासह वकील एसीबीच्या पथकाला रंगेहाथ सापडला आहे. त्यामुळे सहकारसह सर्वच क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक विभागाच्या एसीबी अधिक्षकपदी शर्मिष्ठा वालावलकर यांची नियुक्ती झाल्यापासून मोठ्या संख्येने लाचखोर सापडत आहेत. यापूर्वी सापळे लावले जात असले तरी प्रत्यक्षात त्यामध्ये यश येत नव्हते. आता मात्र, वालावलकर यांच्या नेतृत्वात एसीबीच्यावतीने जोरदार कारवाई सुरू आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास दररोज एक लाचखोर जाळ्यात सापडत आहे. आता मात्र, एसीबीच्या पथकाला थेट जिल्हा उपनिबंधकच गवसला आहे.

सतिश भाऊराव खरे (वय ५७, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक वर्ग-१ रा. फ्लॅट नंबर २०१, आई हाईट्स, कॉलेज रोड), आणि शैलेश सुमातीलाल सभद्रा (वय ३२, वकील, रा. फ्लॅट नं ४, उर्वी अपार्टमेंट, सौभाग्य नगर, गंगापूर रोड) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. याच निवडणुकीत एका बाजार समितीमध्ये संचालकपदी एक जण कायदेशीर पद्धतीने व वैधपणे म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे निवडी विरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावर सुनावणी घेणे आणि त्याचा निकाल संचालकाच्या बाजूने लावण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा एजंट सभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती.

याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि लाचखोर खरे याने ही रक्कम त्याच्या कॉलेजरोड येथील राहत्या घरी स्विकारली. त्यामुळे तो रंगेहात सापडला. याप्रकरणी खरे आणि साभद्रा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Previous articleशेवरेत आदिवासी जनजागृती मेळावा उत्साहात संपन्न
Next articleधनगर समाजाचे भाऊसाहेब ओहळ यांना उर्जावान युवा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान —
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here