Home नाशिक श्रीक्षेत्र कातरणी येथे उद्या हभप कारभारी भाऊ चिकटगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड...

श्रीक्षेत्र कातरणी येथे उद्या हभप कारभारी भाऊ चिकटगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह सांगता—

142
0

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0052.jpg

श्रीक्षेत्र कातरणी येथे उद्या हभप कारभारी भाऊ चिकटगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह सांगता—

दैनिक युवा मराठा
निफाड (रामभाऊ आवारे)

नाशिक जिल्ह्यातील नंबर 2 चा अखंड हरिनाम सप्ताह म्हणून नावलौकिक मिळविलेल्या श्रीक्षेत्र कातरणी तालुका येवला येथील 87 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प कारभारी भाऊ चिकटगावकर यांच्या जीवा- शिवाचे ऐक्य सांगणाऱ्या काल्याचे किर्तनाने होणार असून या कार्यक्रमासाठी कातरणीसह परिसरातील भाविकांनी या ज्ञानामृताचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान हभप विजय कु-हाडे व समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ कात्री यांनी केले आहे.
श्री क्षेत्र कातरणी येथे निर्जला एकादशी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवारपासून सुरु झालेला नाशिक जिल्ह्यातील क्रमांक दोन चा असलेला सप्ताहाचे ८७ व्या वर्षात पदार्पण , त्यानिमित्ताने दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी ६ ते ८वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत भजन संध्या, दुपारी ४ते ६ वाजेपर्यंत संत जीवन कथा ,सादरकर्ते हभप भागवताचार्य ज्ञानेश्वर माऊली नागरे जालना ,संध्याकाळी ६ते ७वाजता हरीपाठ ,७ ते ९वाजेपर्यंत हरीकिर्तन व दररोजच महाप्रसादाची पंगत चालू आहे. सातही दिवस हरी किर्तंनाला महाराष्ट्रातील अनेक दिग्गज महाराज हजेरी लावुन गेले. हभप.एकनाथ म.सदगीर ठाणे, हभप.पोपट म.पाटील कासारखेडा, हभप.अनिल म.बार्शीकर , हभप.भगीरथ म.काळे नाशिक, हभप. सुनील महाराज झांबरे बीडकर , हभप.योगीराज म.गोसावी पैठण यांचे किर्तन झाले आज ,बुधवारी निर्जला एकादशी निमित्त हभप. ज्ञानेश्वर माऊली (छोटे माऊली) आळंदीकर व दिनांक १जुन रोजी गुरूवारी सकाळी ८ते १०वाजेपर्यंत हभप. कारभारी भाऊ चिगटगावकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे,मार्गदर्शक हभप कारभारी भाऊ चिगटगावकर,हभप नवनाथ महाराज नागरे जालणा,तसेच गुणीजन हभप. प्रकाश म.नागरे ,हभप. ज्ञानेश्वर माऊली नागरे जालणा, मृदुंगाचार्य ओमकार म.रायते ,हभप वैभव म‌.वाकचौरे ,स्वप्नील कुलकर्णी (गुरू) ज्ञानेश्वरी साऊंड वागदर्डी, वाल्मीक पवार हे उपस्थित असतात, सप्ताह निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी व दत्त मंदिराला रंगरंगोटी करुन परीसराची साफसफाई केली, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली या सप्ताह सोहळ्याला कातरणी व परीसरातील सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे तरुण भजनी मंडळी व ग्रामस्थ यांनी आवाहन केले आहे.

Previous articleआस्थापना विभाग प्रमुख बळीराम पवार सेवानिवृत्त
Next articleमहा अंनिस तर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिवसानिमित्त सेवनमुक्त राहण्यासाठी अनेकांनाचा शपथविधी संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here