Home नांदेड आस्थापना विभाग प्रमुख बळीराम पवार सेवानिवृत्त

आस्थापना विभाग प्रमुख बळीराम पवार सेवानिवृत्त

120
0

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0090.jpg

आस्थापना विभाग प्रमुख बळीराम पवार सेवानिवृत्त
लोहा,
येथील रहिवाशी तथा अहमदपूर नगर परिषदेचे अस्थापणा विभागाचे प्रमुख बळीराम बाळाजी पाटील पवार हे दि. ३१ मे रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती झाले. त्यांचा सहकारी पालिका कर्मचारी मंडळींकडून सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला.
अहमदपूर जि. लातूर नगर परिषदेचे अस्थपणा विभागात प्रमुख पदावर कार्यरत असलेले बळीराम बाळाजी पाटील पवार यांनी तब्बल ३१ वर्ष विविध पालिकेत निष्कलंक सेवा बजावली. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे २५ वर्ष, देगलुर येथे ३ वर्ष तर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पालिकेत ३ वर्ष सेवा बजावली. अत्यंत प्रामाणिक, मनमिळाऊ, मितभाषी, कार्यालयीन कामात तज्ञ व सर्वांना सोबत घेवून चालणारे वरिष्ठ कर्मचारी म्हणून त्यांची विशेष ओळख असलेले पवार प्रदीर्घ सेवेनंतर बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सहकारी पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन पालिका सभागृहत आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी सेवानिवृत्ती कर्मचारी पवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यालयीन अधीक्षक बिलापट्टे, वरिष्ठ अभियंता काझी, भादाडे, सचिन पवार दिनेश पवार, प्रल्हाद वाघमारे सह बहुसंख्येने पालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here