Home अमरावती मंदिरात तोकडे पोशाख वस्त्र घालणाऱ्यांना; भक्तासाठी प्रवेशासाठी मंदिरात प्रवेश बंदी.

मंदिरात तोकडे पोशाख वस्त्र घालणाऱ्यांना; भक्तासाठी प्रवेशासाठी मंदिरात प्रवेश बंदी.

147
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230601-050150_WhatsApp.jpg

मंदिरात तोकडे पोशाख वस्त्र घालणाऱ्यांना; भक्तासाठी प्रवेशासाठी मंदिरात प्रवेश बंदी.
दैनिक युवा मराठा नेटवर्क

पी. एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
नागपूर प्रमाणे आता अमरावती मधील आठ मंदिरांनी भक्तासाठी मंदिर प्रवेश साठी वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तोकडे किंवा अंग प्रदर्शन करणारी किंवा उत्तेजक कपडे परिधान केलेल्या भक्तांना आता मंदिरात दर्शन घेता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका मंदिर महासंघाने मंगळवारी महाकाली माता मंदिर येथे घेतली. मंदिराचे पवित्र, मांगल, शिष्टाचार तसेच संस्कृती जपण्यासाठी मंदिरांनी वस्त्रसहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील ठराव फेब्रुवारी महिन्यात जळगाव येथे झालेल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत घेण्यात आला होता. अमरावती येथे झालेल्या क्रांती देशांमध्ये याविषयी चर्चा झाल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संबंध सुनील धनवट यांनी दिली. ज्याप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयात वस्त्र संहिता लागू आहे. शाळा, महाविद्यालय, न्यायालयात वस्त्र संहिता लागू आहे. तर मग मंदिरात वस्त्र संहिता लागू झाल्यावरच त्याला विरोध का? असा प्रश्नही पत्रिका परिषदेत उपस्थित करण्यात आला. दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यातील जवळपास २५ मंदिरामध्ये हा निर्णय लागू होणार असून, सध्या ८ मंदिरामध्ये वस्त्र संहिता लागू झाली असतील झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रशासन किंवा राजकीय दबावातून हा निर्णय कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे होणार नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी महाकाली माता मंदिर विठाधीश्वर शक्ती महाराज, राजेंद्र पांडे, नितीन व्यास, श्रीकांत पिसोळकर, विनीत पाकोडे, अनुप जैस्वाल, मीना पाठक, राजेश हेडा, जयेश हेडा उपस्थित होते. जिल्ह्याची ओळख असलेल्या अंबादेवी संस्थान सह बालाजी मंदिर जस्तंभ चौक, पिंगळा देवी देवस्थान नेर पिंगळी, संतोषी माता मंदिर, आशा मनीषा देवी संस्थान दर्यापूर, श्री लक्ष्मीनारायण देवस्थान देवळी, शैतूतबाग हनुमान मंदिर परतवाडा, दुर्गा माता मंदिर वैष्णो धाम, तसेच महाकाली माता मंदिर या ठिकाणी वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. या ठिकाणी टोकडे कपडे घालून दर्शनासाठी आलेल्या भक्तांना बाहेरच थांबून त्यांना महिला असेल तर वणी व पुरुष असेल तर लुंगी परिधान केल्यानंतरच आत मध्ये प्रवेश मिळेल.

Previous articleराजमाता अहिल्याबाई होळकर जयती अजंग यथे भव्य मिरवणूक
Next articleआस्थापना विभाग प्रमुख बळीराम पवार सेवानिवृत्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here