Home अमरावती पावणे सात लाखाचा भ्रष्टाचार अभियंता सहकार गुन्हा दाखल. ग्रामीण पुरवठा योजनेत सरपंच,...

पावणे सात लाखाचा भ्रष्टाचार अभियंता सहकार गुन्हा दाखल. ग्रामीण पुरवठा योजनेत सरपंच, ग्रामसेवक आरोपी न्यायालयाचा आदेश.

50
0

Yuva maratha news

1000319567.jpg

पावणे सात लाखाचा भ्रष्टाचार अभियंता सहकार गुन्हा दाखल. ग्रामीण पुरवठा योजनेत सरपंच, ग्रामसेवक आरोपी न्यायालयाचा आदेश.
दैनिक युवा मराठा 
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती.
अमरावती पाणीटंचाई निवारणार्थ रागविलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत ६.७५ लाखाच्या भ्रष्टाचार वर थेट न्यायालयाचे शिक्कामूर्त केले आहे. न्यायालयीन आदेशानुसार, त्या भ्रष्टाचार प्रकरणी शिरसगाव कसबा पोलिसांनी २४ एप्रिल रोजी दुपारी दोन शाखा अभियंता सह सरपंच व ग्रामसेवक विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कुरा देशमुख येथे ३१ डिसेंबर २०१८ मध्ये तो आर्थिक भ्रष्टाचाराचा प्रकार घडला होता. याप्रकरणी, अमरावती जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता जितेंद्र गजबे वय ५८ तक्रार नोंदवली. त्या आधारे, ग्रामीण पुरवठा विभाग, अचलपूरचे शाखा अभियंता विजय सटाले व दीपक डोंगरे यांच्यासह देशमुख येथील सरपंच सविता कडू व ग्रामसेवक एस एम भांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेले जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खबर होणारी आहे. वर्ष २०१८ मध्ये ग्रामपंचायत कुरा देशमुख येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे तेथे ग्रामपंचायत अंतर्गत १५ लाख रुपये खर्चून तात्पुरती पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्या योजनेमध्ये चारही आरोपींनी ६.७५ लाख रुपयाचा भ्रष्टाचार करून शासनाची फसवणूक केली तथा पैशाचा अपहार केल्याची तक्रार जिल्हा परिषद कडे करण्यात आली होती. त्यावर जिल्हा परिषद ने चौकशी समिती देखील स्थापन केली होती. समितीने चौकशीचा अहवाल अंतिम त्यात आर्थिक अपहार झाल्याचा निष्कर्ष देखील काढला. सदर बाबत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. भ्रष्टाचाराबाबत वर्ष २०२३ मध्यम मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका देखील दाखल करण्यात आली. त्यावर न्यायालयाने १९ मार्च२०२४ च्या आदेशाने संबंधिवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले. त्या आधारे न्यायालयीन आदेश व उपकार्यकारी अभियंताच्या लेखी तक्रारीवरून शिरजगाव कसबा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कुरा देशमुख येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेत झालेल्या आर्थिक अपहरण प्रकरणी चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली होती. अहवाला तरी त्यावर शिक्का मोर्तब झाले होते. अहवालातही त्यावर शिक्का मोर्तब झाले होते. अलीकडे त्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सभा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदविली आहे. सदर माहिती जितेंद्र कसबे उपकार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी सांगितले.

Previous articleईव्हीएम मध्ये बिघाड, पाण्याची असुविधा, तरी मतदार उत्साहात मोठा.
Next articleआगीत घर जळून खाक ; नुकसानग्रस्त कुटुंबाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here