आशाताई बच्छाव
देगलूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखाधिकाऱ्यांची बदली करा : मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आमरण उपोषण.
देगलूर तालुका प्रतिनिधी:-(गजानन शिंदे)
देगलूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुजोर शाखाधिकाऱ्यांची बदली करा अन्यथा या बँकेला 3 ऑक्टोबर पासून देगलूर येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला शिवसेना विभागप्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर हे आमरण उपोषणाला बसले होते तर दि.5 ऑक्टोबर रोजी बॅकेला कुलूप ठोकून, निदर्शने करण्यात आली यावेळी नांदेड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रबंधक निखील नाफडे यांनी 8 दिवसात बदली करण्याची व दि.6 ऑक्टोबर पासून सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले
येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी टोलनारे हे गोर – गरीब ,दिनदलित, वृद्ध, तसेच शेतकरी या बँकेत कर्ज प्रकरणी चकरा मारुन थकुन जातात पण कर्ज मंजूर न करता आलेल्यांना अरेरावीची भाषा बोलून अपमानास्पद वागणूक देऊन बॅंकेतून हाकलून देतात.कर्ज का मंजूर करत नाहीत अशी विचारणा करणाऱ्यांना बँकेतून तात्काळ निघून जा नाहीतर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी शाखाधिकारी टोलनारे हे वारंवार देत असतात. आपले काम काय? आपण काय करत आहोत याचे भान न ठेवता बँकेत कामानिमित्त आलेल्या ग्राहकांनाच गुन्हा दाखल करण्याची धमकी शाखाधिकारी देत असल्याने या शाखाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा अन्यथा बँकेला कुलूप ठोकून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील तालुका प्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला त्यानुसार यावेळी शिवसेना विभागप्रमुख गंगाधर पाटील चाकूरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख राम राजुरे, आदीसह असंख्य पदाधिकारी येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.3 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाला बसले होते या उपोषणाची दखल घेतली नसल्याने दि.5 ऑक्टोबर रोजी बॅकेला तालाठोको निदर्शने, डपली बजाओ आंदोलन करण्यात आले, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर समन्वयक नागनाथ वाडेकर, मतदारसंघ संघटक राजेंद्र इंगळे सर खानापूरकर, शहर प्रमुख बालाजी मैलागिरे, संभाजी ब्रिगेड चे तालुका प्रमुख जेजेराव पाटील करडखेडवाडीकर, युवा सेना उपशहरप्रमुख संदीप शिंदे युवा सेना उपजिल्हाप्रमुख सूधाकर उल्लेवार श्रीनिवास उल्लेवार, अल्पसंख्याक सेनेचे तालुकाप्रमुख जावेदभाई, शहराध्यक्ष युसुफ भाईमिस्त्री , फय्याकभाई, शिवसेना उपशहरप्रमुख बाबुराव मिनकीकर, शिवसेना शहर समन्वयक विनोद सोनकांबळे, युवा सेना शहर समन्वयक संतोष कांबळे, युवा सेना उपतालुकाप्रमुख राम राजुरे, विभाग प्रमुख राजु उल्लेवार मुजळगेकर, तुकाराम निवळे, प्रकाश गोपछडे, उपविभाग प्रमुख हाणमंत राजुरे, किशन राजुरे, युवा सेना उपतालुकाप्रमुख अमोल जगन्नाथ पाटील मुंडकर , परमेश्वर कोकणे सरपंच राजुरे, सरपंच गजले , शिवाजी जाधव ,ज्ञानोबा सुपनर, बालाजी बिरादार आदीसह शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.






