Home बुलढाणा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रजासत्ताकदिनी बक्षीस वितरण...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रजासत्ताकदिनी बक्षीस वितरण सोहळा संपन्न !

204

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0100.jpg

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रजासत्ताकदिनी बक्षीस वितरण सोहळा संपन्न !

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क संग्रामपूर)

हिंदुह्दयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयत्तीनिमित्त जिल्हा परीषद हायस्कुल पातुर्डा बु. येथे दिनांक 23 जानेवारी रोजी बाळासाहेब एक व्यक्तिमत्व या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमधे वर्ग 8 ते 12 पर्यतच्या भरपुर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यामधे प्रथम पारीतोषिक कु. तृप्ती कंरागळे हीने पटकावला तर द्वितिय पारीतोषिक कु. प्रांजली देशमुख व तृतिय पारीतोषिक पुनम दाभाडे हीने पटकावला असुन दि. 26-जानेवारी 2023 रोजी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम पारीतोषिक रविभाऊ झाडोकार शिवसेना तालुका प्रमुख, द्वितिय पारीतोषिक कैलास कडाळे तालुका ऊपप्रमुख, तृतिय पारीतोषिक डिंगाबर चोपडे तालुका ऊपप्रमुख, यांचेकडुन रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन शिवसेना संग्रामपुर तालुक्याच्या वतिने सन्मानित करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रविभाऊ झाडोकार, तालुका ऊपप्रमुख डिंगाबर चोपडे, तालुका ऊपप्रमुख कैलास कडाळे पाटील, विभाग प्रमुख निलेश झाडोकार, माजी सरपंच विलास मानकर, शाखा प्रमुख विठ्ठल अढाव, भैय्या पाटील, सुनिल अढाव, शंकर मुयांडे, आनंदा आकोटकार, व अन्य शिवसैनिक व समस्त शिक्षक वृंद ऊपस्थित होते.