Home रत्नागिरी खेडमधील संगलट गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी मुजीबभाई नाडकर यांची निवड

खेडमधील संगलट गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी मुजीबभाई नाडकर यांची निवड

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0096.jpg

खेडमधील संगलट गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी मुजीबभाई नाडकर यांची निवड                         रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

खेड तालुक्यातील संगलट ग्रामपंचायतच्यावतीने महत्वपूर्ण सभा आज पार पडली. या ग्रामसभेसाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती. ग्रामसभेमध्ये विविध प्रश्न, विकासकामे सोडवण्यात आली. यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर भाई नाडकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी नव्याने महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून संगलट गावचे सामाजिक कार्यकर्ते मुजीबभाई नाडकर यांची निवड करण्यात आली. आपल्यावर गावाने टाकलेला विश्वास आपण पूर्ण करून सर्वसामान्याना न्याय देणार असल्याचे नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष मुजीब नाडकर यांनी सांगितले.

यावेळी संगलट ग्रामपंचायतच्या सरपंच सौ मेहराज कौचाली, उपसरपंच दिलीप महाडिक, माजी उपसभापती मन्सूर भाई नाडकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष मुराद भाई अफवारे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक खलीलभाई नाडकर, ग्रामपंचायत सदस्य अमान नाडकर, अकबर नाडकर, सईद नाडकर, बिलालभाई नाडकर, हमीद भाई नाडकर, मोहसीन नाडकर, नजीरभाई नाडकर, सुलतानभाई नाडकर, नासिर नाडकर मुंबईतील प्रसिद्ध व्यवसाईक इमत्याजभाई नाडकर, इकबाल नाडकर, ग्रामसेवक मेघे, सिराज नाडकर, सामाजिक कार्यकर्ते आदमभाई कौचाली तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी कृष्ण भाई कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री मुजीबभाई नाडकर यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड झाल्याने यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here