Home जळगाव ग्रामपंचायत उमर्टी येथे लाखों रुपयांचा घोटाळा उघडकीस..

ग्रामपंचायत उमर्टी येथे लाखों रुपयांचा घोटाळा उघडकीस..

204
0

आशाताई बच्छाव

IMG-20230521-WA0034.jpg

ग्रामपंचायत उमर्टी येथे लाखों रुपयांचा घोटाळा उघडकीस..

जळगाव जिल्हा ब्यूरो चिफ – योगेश पाटील.

चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतात असलेले ग्रामीण भागातील पेसा ग्रामपंचायत उमर्टी येथील ग्रामसेवक वासुदेव रामसिंग पारधी यांनी पेसा निधी हडप केलेली तारीख ३१सप्टेंबर २०२२ते ३१मार्च २०२३ पर्यंत तसेच १४वित्त,१५वित्त आयोग ,मानव विकास योजना अश्या विविध निधीतून एकून ५५ लाख रुपयांचा घोटाळा केलेला आढळून आला यात परस्पर खाते वापर करणे, बाहेरून ग्रामपंचायत हाताळणे, चुकीचे बिल बनविणे, बनावट सह्याचा वापर करुन निधी हडप करणे, ग्रामपंचायत चे संपुर्ण दफ्तर घरी बसून गैरवापर करणे, अश्या प्रकारचे पराक्रम करुन भ्रष्टाचार केलेला आढळून आला आहे .
यावेळ उपसरपंच संदीप सुभाष सांगोरे, व लोकनियुक्त सरपंच रिनेश रमेश पावरा यांनी खंत व्यक्त केली की आमच्या गावात खूप मोठा भोंगळ कारभार वासुदेव पारधी यांनी केलेला आहे परस्पर सर्व ग्रामपंचायत च्या खात्यांचे मालक बनणे, गावागावात एकमेकांचे भांडण लावणे, एकमेकांविरूद्ध भडकावून शांतता भंग करणे, तसेच गटविकास अधिकारी ही या प्रकरणावर वारंवार दुर्लक्ष करत आहे. व अशा ग्रामसेवकांना पाठीशी घालत आहेत. सर्व मिलीभगत असून आर्थिक व्यवहारात देखील ग्रामसेवकाला पाठीशी घातले जात आहे. याबाबतीत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी असे आपले म्हणणे सर्व गावकऱ्यांसमोर व महाराष्ट्र न्यूज 10 चे जिल्हा प्रतिनिधी विनायक पाटील.व इतर पत्रकारांसमोर सरपंच यांनी व्यक्त केले यावेळी उपसरपंच संदीप सांगोरे यांनी एकूण गायब झालेला निधीचा हिशोब वाचून दाखविला प्रोसेडिंग बुक कोरी पडलेली होती. कोणतेच काम कायदेशिर केलेले आढळून आलें नाही. यावेळी एकून सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर राहून याविरुद्ध आवाज उठविला तसेच गावातली जास्तीत जास्त ज्येष्ठ व्यक्ती या ठिकाणी उपस्थित राहिले व शासन परिपञक क्रमाक व्हीपीएम – २०१३ /प्र.क्र.१३७/पंरा.३ दि.१२ जुन २०१३ या परिपञकानुसार ग्रामपंचायतीत आर्थिक व्यवहार करने व मालमत्ता अथवा निधीचा अपहार करणे तसेच उमर्टी ग्रामपंचायतील मुळ दस्ताऐवज खोट्या बनावट कागदपञाचा व खोट्या सयांच्या समावेश करणे या गुन्ह्यास जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवक विरुद्ध फौजदारी गुन्हा तांत्काळ दाखल व्हावा असेही सरपंच ,उपसरपंच, सदस्य, व समस्त गावकरी यांचे म्हणणे सर्वांसमोर स्पष्ट केले.

Previous articleपंढरपूर देवस्थानच्या स्वच्छतेकडे तात्काळ लक्ष घालण्याची गरज
Next articleमिस्ड कॉल द्या….! मुख्यमंत्री सहायता निधी माहिती मोबाईल वर मिळवा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here