Home नाशिक गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित शेकोटी लोककला साहित्य संमेलनात बागलाण चे सुपुत्र सोमदत्त...

गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित शेकोटी लोककला साहित्य संमेलनात बागलाण चे सुपुत्र सोमदत्त मुंजवाडकर यांना “स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कार”

196

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0030.jpg

गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित शेकोटी लोककला साहित्य संमेलनात बागलाण चे सुपुत्र सोमदत्त मुंजवाडकर यांना “स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कार”

भास्कर देवरे(युवा मराठा न्युज)

दिनांक १४ व १५ जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या शेकोटी लोककला साहित्य संमेलनात अड. सोमदत्त मुंजवाडकर (वकील, सटाणा कोर्ट) यांच्या मराठी धुक्यातल्या पाऊलखुणा या कवितासंग्रहाला स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कार मिळाला. निवेदक या कवितासंग्रहाबद्दल व यापूर्वी मुंजवाडकर यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल माहिती देत होते. त्यावेळी स्टेजवर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मा.विजय सूर्यवंशी साहेब महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यआयुक्त यांनी सोमदत्त मुंजवाडकर या नावाने ओळखल्यामुळे तेही म्हटले की मी पण मुंजवाड़चाच आहे. एका मुंजवाडच्या भूमिपुत्राचा सत्कार मुंजवाड़च्याच भूमिपुत्राने करावा ही मुंजवाडसाठी व महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट होती. त्यानंतर या संमेलनात अहिराणी व मराठी कवी कट्टा गाजवण्याचाही सन्मान मा. सोमदत्त मुंजवाडकर यांना मिळाला. मा.विजय सूर्यवंशी साहेबांनी सपत्नीक कवितांचा आस्वाद घेतला.

Previous articleधनुष्यबाण’ कोणाला..? प्रश्न कायम; ‘या’ तारखेला पुढील सुनावणी
Next articleसंत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त दुमदुमली त्र्यंबक नगरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.