Home राजकीय धनुष्यबाण’ कोणाला..? प्रश्न कायम; ‘या’ तारखेला पुढील सुनावणी

धनुष्यबाण’ कोणाला..? प्रश्न कायम; ‘या’ तारखेला पुढील सुनावणी

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0029.jpg

धनुष्यबाण’ कोणाला..? प्रश्न कायम; ‘या’ तारखेला पुढील सुनावणी
भास्कर देवरे (युवा मराठा न्युज)

राज्याचा राजकारणात शिंदे गटाची बंडखोरी आणि सत्तापालट मोठी घटना आहे. यानंतर शिवसेनेत उभी फुट पडून ठाकरे विरुध्द शिंदे असे दोन गट पडले. या गटांना नंतर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ठाकरे गट) असे नाव देण्यात आले. मात्र दोन्ही गटांमधील संघर्ष अद्यापही संपला नाहीये. धनुष्यबाण चिन्हावरून हे दोन्ही गट आमनेसामने आहेत.
याबाबत काल केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली असून धनुष्यबाणाबाबत कुठलाही निर्णय झाला नाही तर सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. दोन्ही पक्षांच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्वाची असून मागील सुनावणी वेळी शिंदे गटाने आपली बाजू मांडली होती. दरम्यान काल ठाकरे गटाची बाजू मांडण्यात आली. धनुष्यबाण चिन्हबाबत काय निर्णय होणार ? या कडे सगळ्यांचेच लक्ष लागून होते. मात्र कालही निकाल लागला नसून येत्या २० जानेवारीला म्हणजे शुक्रवारी पुन्हा धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होईल.

कालच्या सुनावणीतील युक्तिवाद

धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावरून १० जानेवारीला केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या पक्ष चिन्हाविषयी सुनावणी झाली होती. या सुनावणीत शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता. कालही त्याचप्रकारे युक्तिवाद करण्यात आला. ‘शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहे, शिंदे गटाचे प्रतिज्ञापत्र बोगस आहे, धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आताच नको, काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणे बेकायदेशीर आहे’, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. त्यानंतर ‘शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी नाही, ठाकरे गटाचा हा आरोप चुकीचा,लोकप्रतिनिधींसोबत पक्षाचा मोठा गट बाहेर पडल्यास बेकायदेशीर कसा, आमच्याकडे संख्याबळ जास्त असून चिन्हाचा निर्णय तातडीने घ्या, आमदार खासदारांचे बहुमत शिंदेंकडे’, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. शिवसेना फुटल्यानंतर एकीकडे शिंदे गटाकडून शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू होत्या. तर दुसरीकडे ‘धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. ते कोणालाही हिरावून घेता येणार नाही’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे देत होते. ‘धनुष्यबाण’ निशाणी संदर्भात दोन्ही बाजूंनी निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हाबाबत काही दिवसांपासून सुनावणी प्रक्रिया सुरु होती. मध्यंतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा हे चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे आणि पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here