Home नाशिक भाक्षी ग्रामपंचायतीच्या कथित गैरव्यवहाराची विभागीय आयुक्तामार्फत चौकशीची मागणी

भाक्षी ग्रामपंचायतीच्या कथित गैरव्यवहाराची विभागीय आयुक्तामार्फत चौकशीची मागणी

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0017.jpg

भाक्षी ग्रामपंचायतीच्या कथित गैरव्यवहाराची विभागीय आयुक्तामार्फत चौकशीची मागणी

भास्कर देवरे (युवा मराठा न्युज):- बागलाण तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतीच्या लाखो रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने तक्रारदारांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांचीच उलट तपासणी करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अर्जाद्वारे माहिती देऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चा केली जात आहे.
भाक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या विकास कामांच्या निधीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश देवरे, पंकज कापडणीस व गोरख देवरे यांनी दि. ५ व ९ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या अनुषंगाने निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी सुहास शिंदे व शाखा अभियंता यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली होती. त्यानुसार 4 नोव्हेंबर रोजी संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीस भेट दिली व तक्रार कर्त्यांनाही प्रत्यक्ष बोलावून घेतले होते. त्यावेळी माहिती अधिकारात प्राप्त माहितीप्रमाणे दलित वस्ती
सुधार योजनेअंतर्गत रमाई नगर, आंबेडकर नगर व बौद्ध नगर कुठे आहेत याची आपण प्रत्यक्ष पाहणी करावी, भाक्षी गावातील स्मशानभूमीच्या जागेवरील मुरूम चोरीची पाहणी करावी, बेकायदेशीरपणे वितरित केलेल्या ओपन प्लेस ची माहिती जाणून घ्यावी, तसेच निकृष्टपणे केलेल्या इतर कामांची ही प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करून घ्यावी असे तक्रार कर्त्यांनी यावेळी सांगितले. मात्र समितीतील अधिकाऱ्यांनी काही एक ऐकून न घेता ग्रामसेवकाने आम्हाला माहिती दिलेली आहे आम्ही पाहून घेऊ तुम्ही आता येथून निघून जा असे सांगून तक्रार कर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.
किमान आम्ही केलेल्या तक्रारीनुसार कामांची पाहणी तरी करून घ्या, असेही तक्रार कर्त्यांनी सुचित केले असता, चौकशी कशी करायची हे तुम्ही आम्हाला शिकवू नका, आमच्या पद्धतीने आम्ही चौकशी करू असे उद्धटपणे उत्तर देऊन तक्रार कर्त्यांना अपमानीत केले होते. दरम्यान या पार्श्वभूमीवर तक्रार कर्ते प्रकाश देवरे व इतरांनी विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडेनिपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी
केली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी निपक्षपातीपणे चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर पुनश्च आमरण उपोषण केले जाईल असा इशारा तक्रार कर्त्यांनी दिला आहे.

Previous articleगोजेगाव ते रावी महामार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे  नाही केल्यास उपोषणाचा इशारा..जावेद बशीर कुरेशी
Next articleधनुष्यबाण’ कोणाला..? प्रश्न कायम; ‘या’ तारखेला पुढील सुनावणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here