Home नांदेड गोजेगाव ते रावी महामार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे  नाही केल्यास उपोषणाचा...

गोजेगाव ते रावी महामार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे  नाही केल्यास उपोषणाचा इशारा..जावेद बशीर कुरेशी

165

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0015.jpg

गोजेगाव ते रावी महामार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे  नाही केल्यास उपोषणाचा इशारा..जावेद बशीर कुरेशी
मुखेड प्रतिनिधी (बस्वराज स्वामी वंटगिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील रेनापुर-निजामाबाद राष्ट्रीय महा मार्गारील मौ.गोजेगाव ते रावी रस्ता अत्यंत खराब झाला आहे.वारंवार न्युज पेपर मध्ये देऊनही अधिकार्यांचे व राजकीय मंडळी चे डोळे उघडत नाहीत.म्हनुन मुक्रमाबाद येथील जावेद कुरेशी यांनी ते तात्काळ दुरुस्ती करण्यात यावा.नाही केल्यास दि.३०/०१/२०२३ रोजी बसस्थानक मुक्रमाबाद येथे आमरण उपोषण करुन असा इशारा एका नीवेदना द्वारे तहशील कार्यालयात जावेद कुरेशी यांनी तहशीलदार साहेबांना नीवेदन देण्यात आले.
अर्जदार जावेद कुरेशी यांनी निवेदनात असा उल्लेख केला आहे की रेणापूर ते निजामाबाद महामार्ग असून गोजेगाव ते रावी पर्यंत हा रस्ता अत्यंत बीकट व खराब झालेला आहे रस्त्याच्या मधोमध खड्डे पडलेले आहेत प्रवाशांना आपले जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी खड्डे बुजविण्यात आले होते पण गुत्तेदारांनी त्या खड्ड्याला मातीचा लेप देऊन खड्डे बुजविण्यात आला होता. त्यामुळे धुळीचा प्रमाण अधिकच वाढत आहे या धुळीमुळे पुढील छोटासा वाहन दिसत नाही म्हणून छोटे-मोठे अपघात होत आहेत शाळेचे विद्यार्थी सुद्धा या रस्त्यावरून प्रवास करत असताना त्यांना या धुळीचा सामना करावा लागत आहे काही विद्यार्थी या धुळीमुळे आरोग्याचे धोका झालेले दिसत आहे मेहरबान साहेबांनी आमच्या या रस्त्याचा तात्काळ दुरुस्त करण्यात यावा दुरूस्ती नाही केल्यास आम्ही मुक्रमाबाद येथील बसस्थानकावर आमरण उपोषण करू असा इशारा जावेद कुरेशी नीवेदनात दिला आहे.

Previous articleतामलवाडी येथे छत्रपती संभाजी राजे राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा
Next articleभाक्षी ग्रामपंचायतीच्या कथित गैरव्यवहाराची विभागीय आयुक्तामार्फत चौकशीची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.