Home नाशिक संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त दुमदुमली त्र्यंबक नगरी

संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त दुमदुमली त्र्यंबक नगरी

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0039.jpg

संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त दुमदुमली त्र्यंबक नगरी

भास्कर देवरे(युवा मराठा न्युज नेटवर्क)

आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथं मोठी यात्रा भरते. या यात्रे निमित्त हजारो वारकरी नाशकात दाखल झाल आहेत. टाळ,मृदुंग यांच्या गजरात नाशिक दुमदुमुन निघालं आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी सकाळीच सपत्निक संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची शासकीय महापूजा केली.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही वैष्णव संप्रदायाची आद्यप्रवर्तन भूमी असून संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे यात्रा-उत्सवानिमित्त निघणाऱ्या पालखी सोहळ्याचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वागत करण्यात येते. श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेल्या दिंड्यांद्वारे अभंग – कीर्तन केले जाते

पालकमंत्री दादा भुसे यांनी केली सपत्निक शासकीय महापूजा

आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथं मोठी यात्रा भरते. या यात्रे निमित्त हजारो वारकरी नाशकात दाखल झाल आहेत. टाळ,मृदुंग यांच्या गजरात नाशिक दुमदुमुन निघालं आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी सकाळीच सपत्निक संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची शासकीय महापूजा केली. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सूर्यवंशी दाम्पत्याला दर्शनाचे पहिले मानकरी होण्याचा मान मिळाला.
नाशिकच्या अंजनेरी ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या त्र्यंबक नगरीत ज्योतिर्लिंगाच्या सान्निध्यात व गोदातिरी मोठ्या भक्तीभावात ही यात्रा संपन्न होत आहे. गेले दोन दिवस इथं वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. गळ्यात तुळशी माळा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हाती टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेतलेल्या लाखो वारकऱ्यांनी त्र्यंबकनगरी गजबजून गेलेली पाहायला मिळत आहे. करोनाच्या सावटानंतर पुन्हा एकदा भक्तीचा मळा फुलायला सुरुवात झाली आहे. पंढरपुरातत जसं पांडुरंगाचं दर्शान घेण्यासाठी आधी चंद्रभागे स्नान मग दर्शन पांडुरंगाचे असं वारकरी म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसह कुशावर्तात स्नानासाठी वारकी गर्दी करत असल्याचं पहाटे पाहायला मिळालं. सध्य़ा राज्यभर थंडीचा कडाका असूनही भक्तीच्या महासागरात हा कडाका फीका पडल्याचं पाहायला मिळालं. त्र्यंबकनगरीत आज महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात पाहायला मिळाली.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. आजपासून म्हणजेच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजाच्या यात्रेनं त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आगामी काही दिवस पवित्र नाशिकची भूमी टाळ मृदुंग आणि नामस्मरणाने दुमदुमुन जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here