Home नाशिक कर्मवीर भाऊसाहेब हिरे निमगाव महाविद्यालयात महिलारत्न श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजी-नात...

कर्मवीर भाऊसाहेब हिरे निमगाव महाविद्यालयात महिलारत्न श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजी-नात मेळावा हा आगळा-वेगळा उपक्रम

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0036.jpg

कर्मवीर भाऊसाहेब हिरे निमगाव महाविद्यालयात महिलारत्न श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त आजी-नात मेळावा हा आगळा-वेगळा उपक्रम

निमगाव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज) :-  जाने. कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महिलारत्न, लोकमाता, श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात आजी-नाती सत्कार सन्मानाचा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. निमगाव व परिसरातील ज्येष्ठ महिला व त्यांच्या नाती यांना निमंत्रित करून महाविद्यालय व संस्था परिवारातर्फे शाल पुष्पगच्छ आणि ‘भगवतगीता’ देवून यथोचित असा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. यु. बी. कदम हे होते. त्यांनी आदरणीय श्रीमती पुष्पाताई हिरे यांच्या कार्याची सविस्तर माहिती देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना उत्तम आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली.
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती यांचा आदर करावा, सन्मान करावा. कारण ह्या वयात त्यांना कोणत्याही संपत्तीची लालसा नसते. त्यांची खरी संपत्ती हि त्यांची मुले, नातवंडे असतात. असे ते यावेळी म्हणाले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कल्याण कोकणे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. आर. जी. शेवाळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleसंत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त दुमदुमली त्र्यंबक नगरी
Next articleसावित्रीबाई फुले यांचे कार्य जीवनाला कलाटणी देऊ शकते …… मा.बाबुराव माळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here