Home पुणे सावित्रीबाई फुले यांचे कार्य जीवनाला कलाटणी देऊ शकते …… मा.बाबुराव माळी

सावित्रीबाई फुले यांचे कार्य जीवनाला कलाटणी देऊ शकते …… मा.बाबुराव माळी

93
0

आशाताई बच्छाव

IMG-20230118-WA0041.jpg

सावित्रीबाई फुले यांचे कार्य जीवनाला कलाटणी देऊ शकते …… मा.बाबुराव माळी
सांगवी/पुणे,उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केले तर त्यांच्या भविष्याला वेगळी कलाटणी देऊ शकते. यासाठी भरपूर वाचन केले पाहिजे व विद्यार्थ्यांनी जर थोर पुरुषांचे आत्मचरित्र वाचले तर भविष्यात त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच बदल होईल आणि अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे सार्थक होईल. संस्थेचे अध्यक्ष श्री आबासाहेब जंगले राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य आहेत. त्यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांच्या शाळेत आपण शिक्षण घेत आहोत हे तुमचे भाग्य आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सावित्रीबाईंच्या नावाने आपल्याला मदत मिळते आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे असे मत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे निवृत्त सहाय्यक आयुक्त बाबुराव माळी यांनी व्यक्त केले .
छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै.सौ शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय ,शिशुविहार, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदरबाई भानसिंग हुजा गुरुगोविंद इंग्लिश मीडियम स्कूल सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्रीबाई फुले दत्तक पालक अर्थ वितरण समारंभ प्रसंगी माळी साहेब बोलत होते. यावेळी ही शाळा गेली 18 वर्षे हा उपक्रम राबवत असून आजपर्यंत शाळेने विद्यार्थ्यांना 25 लाख रुपयांची मदत केली आहे .यावर्षी शाळा 420 मुला-मुलींना प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे चार लाख वीस हजार रुपयांचे वाटप करत आहे ही अभिमानाची बाब आहेअसे ते म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक मा. शशिकांत कदम यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी मूल्यांची तडतड करू नका, स्वतःचे महत्त्व ओळखा,तुलना करू नका आणि मिळालेल्या संधीचा सोनं करा. तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांच्याकडे पहा ते ज्ञानाने, शरीराने मनाने आणि सामाजिक कार्याने भरलेले अष्टपैलू असे व्यक्तिमत्व आहे त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले . यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 420 विद्यार्थ्यांना अर्थ वितरण करण्यात आले व थिंक शार्फ फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेला शैक्षणीक भरपूर मदत करण्यात आली म्हणुन थिंक शार्फ फाउंडेशनचे अध्यक्ष मा. संतोष फड यांचा नगरी सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले यांनी थिंक फाऊंडेशन व सर्व देणगीदार यांच्याबद्दल कृज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी माजी महापौर सौ माई ढोरे, थिंक शार्फ फाउंडेशनचे अध्यक्ष मा. संतोष फड, सौ रत्नमाला दुधभाते ,कस्पटे वस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका विजया ढमाले, सौ सविता माने ,संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे ,उपाध्यक्ष सतीश साठे, खजिनदार रामभाऊ खोडदे, सचिव तुळशीराम नवले, सदस्य मनीष पाटील, भगिनी निवेता सहकारी बँक सांगवीच्या मॅनेजर श्रीमती सविता थत्ते ,ऑफिसर्स स्नेहा कुलकर्णी , सौ राजश्री पोटे, मनीषा ढवळे, सौ राजश्री जाधव ,सौ रत्नमाला जावळे, सुनील नागवडे, हनुमंत जाधव समीर ढेरंगे ,अमित कुतवळ, डॉ. विक्रम जगताप ,ह भ प प्रभाकर करळे महाराज, शिक्षक पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, परिवहन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंग्रजी माध्यम प्रमुख शोभा वरटी, माध्यमिक प्रमुख शितल शितोळे ,संगीता सूर्यवंशी, शितल गरसुंड, सुनिता टेकवडे, सीमा पाटील ,हेमलता नवले ,मनीषा लाड, स्वप्नील कदम ,दिपाली झणझणे, श्रद्धा जाधव ,संध्या पुरोहित ,पंचशीला वाघमारे, तपस्या सोमवंशी ,नीता ढमाले ,गायत्री कोकाटे ,सायली भगत ,सुरेखा थोरे ,पूजा ढमढेरे, रेश्मा आव्हाड, प्रिया खरात ,प्रिया राणे ,जयश्री तायडे, उषा ठाकर ,श्वेता जोरे, सुचित्रा भोसले, स्नेहल खोंड, अनिता बडी ,निर्मला भोईटे ,कुसुम ढमाले, मनीषा गायकवाड ,चेतना इंगळे ,रोहिणी सावंत आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी केले व सूत्रसंचालन आभार दत्तात्रय जगताप यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here