• Home
  • 🛑 कल्याण डोंबिवलीतही लॉकडाऊन वाढवला 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 कल्याण डोंबिवलीतही लॉकडाऊन वाढवला 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 कल्याण डोंबिवलीतही लॉकडाऊन वाढवला 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 11 जुलै : ⭕ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पुणे आणि ठाण्यापाठोपाठ आता कल्याण आणि डोंबिवलीतही लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. डोंबिवलीत कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी २ ते १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. दरम्यान, आता लॉकडाऊन आणखी सात दिवस वाढवण्यात आला आहे. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १९ जुलै संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल वगळता इतर सर्व आस्थापने बंद राहणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment