• Home
  • 🛑 पुणे पोलिसांनची कोरोना पार्श्वभूमीवर २४ तासात १९६५ कारवाया…! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पुणे पोलिसांनची कोरोना पार्श्वभूमीवर २४ तासात १९६५ कारवाया…! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पुणे पोलिसांनची कोरोना पार्श्वभूमीवर २४ तासात १९६५ कारवाया…! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक कारवाई
सुरुच आहे. नाकाबंदी आणि कारवाईची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार 965 कारवाया केल्या आहेत. 9 जुलैच्या सकाळी 5 वाजेपासून ते आज (10 जुलै) सकाळी 5 वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत विना मास्क फिरणाऱ्या मोकाटांवर सर्वाधिक तब्बल 608 कारवाया आहेत..

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 34 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे.
जिल्ह्यात 34 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 979 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत पुणेकर निष्काळजी असल्याचे दिसत आहे.

– या कारवाईसाठी 227 एक्झिट आणि एन्ट्री पॉईंटवर नाका-बंदी करण्यात आली आहे. नाकाबंदीसाठी 208 अधिकारी आणि 1,262 पोलीस कर्मचारी तैनात आहेत..

– गेल्या 24 तासात विनापरवाना फिरणाऱ्या 485 मोकाटांवर कारवाई करण्यात आली. तर मोकाट फिरणाऱ्यायांची 67 वाहने जप्त करण्यात आली आहे.

– विना मास्क फिरणाऱ्या 608 जणांवर कारवाई करण्यात आली. तर, विना मास्क फिरणाऱ्या 33 मोकाटांची वाहने जप्त करण्यात आली.

– त्याचबरोबर कलम 188 अंतर्गत 415 कारवाया केल्या आहेत.

– ट्रिपल सीट फिरणार्‍या 59 जणांवर, सिग्नाल जम्पिंग 180, रॉंग साईड 71 आणि पादचारी मार्गावर वाहन चालवणाऱ्या 47 जणांवर कारवाई करण्यात आली.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार, येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 10 दिवस लॉकडाऊन असेल. यादरम्यान, फक्त अत्यावश्यक सेवा म्हणजे मेडिकल, दवाखाने आणि दूध सुरु राहील. अत्यावश्यक प्रवासासाठी ई पास गरजेचा असेल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले…..⭕

anews Banner

Leave A Comment