• Home
  • ब्युरो टीम युवा मराठा न्युज  अत्यावश्यक सेवेतील ग्रामपंचायतसेवक वेतनापासून वंचीत राज्यस्तरीय धरणे आंदोलन

ब्युरो टीम युवा मराठा न्युज  अत्यावश्यक सेवेतील ग्रामपंचायतसेवक वेतनापासून वंचीत राज्यस्तरीय धरणे आंदोलन

ब्युरो टीम युवा मराठा न्युज  अत्यावश्यक सेवेतील ग्रामपंचायतसेवक वेतनापासून वंचीत
राज्यस्तरीय धरणे आंदोलन
संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरात अत्यावश्यक सेवा बजावणारे ग्रामपंचायत कर्मचारी यांना गेल्या तीन महिन्यापासून विना वेतन ना शासन स्थारावील ना ग्रामपंचायत हिस्स्यातील वेतन मिळत नसल्याने सध्या कुटुंबाचा गाडा हाकलणे अवघड झाले आहे. कर्मचाऱ्याना त्वरित थकीत वेतन व राहणीमान भत्ता देण्यात यावा व सन २०२०/२१ या चालू आर्थिक वर्षात शंभर टक्के वेतन देण्यासाठी अडथळा निर्माण होणारे वसुलीची उत्पन्नाची अट असणारा शासन निर्णय रद्द करून प्रलंबित मागण्या मान्य करावे, अशा आशयाचे निवेदन बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.कोल्हे साहेब व तहसीलदार मा.इंगळे साहेब तसेच ना.तहसीलदार बहीरम सो यांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने बागलाण तालुका कार्यकारणीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात अशा अशयाचे महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशावर कोरोन विष्णूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर अश्या परिस्थिती गांव पातळीवर शासन व नागरिकांच्या महत्वाचा दुवा म्हणून काम करणार ग्रामपंचायत कर्मचारी यांना एप्रिल २०२० पासून वेतन मिळत नसल्याने कुटुंबाचे आर्थिक नियोजन ढासळले परीणामी कुटुंब चालवणे अवघड झाले. यात शासने सन २०२०/२१ च्या संपूर्ण आर्थिक वर्षात ग्रामपंचायत कर्मचारी यांना पूर्ण वेतन देण्याचा शासन निर्णय दिल्याने कर्मचारी वर्गात समाधानी निर्माण झाली पण २८ एप्रिल २०२० च्या शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत वसुलीची व उत्पन्नाची अट असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतना दरमहा पन्ना टक्के कपात झाली.
एकीकडे शासनाकडून पूर्ण वेतन देण्याचे म्हंटले जाते तर दुसरीकडे राज्यातील कर्मचाऱ्याना किमान वेतन मिळणेसाठी अडथळा निर्माण करणारा वसुलीची आणि उत्पन्नाची अट असणारा २८ एप्रिल २०२० चा शासन निर्णय रद्द करून विविध प्रलंबित मागण्या मान्य करणेसाठी संपूर्ण राज्यभर धरणे /निर्दशने आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर कॉ.तानाजी ठोंबरे राज्य अध्यक्ष, कॉ.नामदेव चव्हाण सरचिटणीस, सखाराम दुर्गुडे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा संघटक सचिव, जिल्हा उपाध्यक्ष उज्ज्वल गांगुर्डे, कॉ.मंगेश म्हात्रे संघटन सचिव, कॉ.मिलिंद गणवीर संघटन सचिव, कॉ.बबन पाटील, सुधीर टोकेकर, वसंत वाघ, अमृत महाजन, बागलाण तालुकाध्यक्ष धर्मा जाधव, सचिव नरेंद्र मोरे मोरे, उपाध्यक्ष दिपक अहीरे संघटक संतोष शिंदे दादाजी आहिरे निवृत्ती आहिरे अशोक आहीरे हरी शेवाळे दत्तु चौरे व आदि कर्मचारी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment