Home गडचिरोली आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते गीलगाव (जमी) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे...

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते गीलगाव (जमी) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे लोकार्पण

90
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0082.jpg

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते गीलगाव (जमी) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे लोकार्पण

बहुप्रतिक्षित पशु वैद्यकीय दवाखान्याची इमारत जनतेच्या सेवेत

आमदार डॉक्टर देवरावजी यांच्या प्रयत्नातून झाली इमारत

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग चामोर्शीच्या वतीने बांधकाम करण्यात आलेल्या पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत मौजा गिलगाव (जमी) येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ च्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी पंचायत समितीचे अधिकारी, पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे अधिकारी, माजी सभापती आनंदराव भांडेकर, गिलगाव जमीनदारी येथील सरपंच ,तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, भाजपा ओबीसी युवा नेते उमेश कुकडे, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, यांचेसह पंचायत समिती व पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेसह स्थानीक नागरिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना उपचारासाठी तालुका केंद्रावर न्यावे लागत होते. परिसरातील शेतकऱ्यांची व लोकांची मागणी लक्षात घेता गिलगाव जमीनदारी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचे बांधकाम व्हावे याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासन स्तरावर अनेकदा प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचे फलित होऊन अखेर इमारतीचे बांधकाम झाले असून आता त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा होतो आहे ही आनंदाची बाब आहे. आता शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना या दवाखान्यात आणून उपचार करता येतील व त्यांना होणारा नाही त्रास आता कमी होईल असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here