• Home
  • शाळा अनुदान च्या GR चे काम या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात होईल – आ.विक्रम काळे

शाळा अनुदान च्या GR चे काम या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात होईल – आ.विक्रम काळे

शाळा अनुदान च्या GR चे काम या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात होईल – आ.विक्रम काळे

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

मुंबई, दि.२ – १४ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळात निर्णय झाला लगेच दुसऱ्या दिवशी मुंबई मध्ये थांबून ना.अजित दादा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु ही भेट झाली नाही. परंतु 1 एप्रिल 2019 पासून शाळांना अनुदान वितरित करावे असे पत्र दिले त्यानंतर ना.श्री.बाळासाहेबजी थोरात ना. प्रा.वर्षाताई गायकवाड तसेच ना.श्री.जयंत पाटील साहेब यांची भेट घेऊन शाळा अनुदान निर्णयात बदल करावा अशी विनंती केली परंतु ना.अजित दादा यांना कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आज पण त्यांची भेट होऊ शकली नाही. म्हणून मा. पवार साहेब यांना भेटून या निर्णयाबद्दल माहिती दिली व आपणही मुख्यमंत्र्यांना बोलावे अशी विनंती केली. आज दिवसभर मुंबई मध्ये थांबून पाठपुरावा केला आहे. परंतु मंत्रिमंडळ बैठक न झाल्याने मागील बैठकीचे इतिवृत्त मंजूर न झाल्यामुळे GR निघायला वेळ लागत आहे . बैठक झाल्यावर या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात GR निघण्याचे काम होईल असे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी यावेळी माध्यमांना कळविले.

anews Banner

Leave A Comment