Home Breaking News *…..संपादकीय!* *”युवा मराठा” संपादकाच्या निवासस्थानाची टेहळणी करणारे भामटे;अन चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ!!*

*…..संपादकीय!* *”युवा मराठा” संपादकाच्या निवासस्थानाची टेहळणी करणारे भामटे;अन चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ!!*

182
0

*…..संपादकीय!*
*”युवा मराठा” संपादकाच्या निवासस्थानाची टेहळणी करणारे भामटे;अन चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ!!*
*वाचकहो,*
आम्ही कौळाणे (निं) व व-हाणे येथे पत्रकार भवनच्या जागा मागणीच्या निर्णयावर ठाम असून,गेल्या १२आँक्टोबर रोजी मालेगांवच्या पंचायत समितीसमोर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देताच,खडबडून जाग्या झालेल्या यंत्रणेने आम्हांला विनंती करीत पत्र दिले की,सदरच्या प्रकरणात चौकशी करुन तात्काळ अहवाल देण्यात येईल.मात्र तात्काळ म्हणजे नेमके काय?या शब्दाचा पुरेसा अर्थच अजून आम्हांला कळालेला नाही.चौकशी अहवाल उपलब्ध करुन देण्यास नेमकी टाळाटाळ का केली जात आहे!यामागे कोणते राजकारण लपलेले आहे.हे अद्याप जरी गुलदस्त्यात असले तरीही आम्ही या कौळाणे व-हाणे पत्रकार भवनाच्या प्रकरणातून माघार घ्यावी,म्हणून झारीतले शुक्राचार्य पडद्याआड लपून आमच्यावर त्यांच्या पाळलेल्या हस्तक दलालामार्फत दबाव आणून धमक्या देत आहेत.की,आम्ही जर हा विषय थांबवलाच नाही तर आम्हांला संपवून टाकले जाईल,आमचा मुडदा पाडला जाईल अशा धमकीवजा गोष्टी गेल्या काही दिवसापासून आमच्या बाबतीत घडत आहेत.
तरीही आम्ही वैचारिक पातळीवर विचार करता या अशा सडकछाप लोकांच्या धमक्यांना कुठल्याही खिजगणतीत मोजदाद देत नाहीत.कारण आमचे समाजप्रबोधनाचे कार्य हे निर्भिडतेने निस्वार्थ भावनेने सुरु आहे.आमचे कुठलेही अवैध धंदे नाहीत की,आम्ही या अशा बांडगुळाच्या धमक्यांनी हादरुन जाऊ!निर्लज्जपणे बेशरमसारखे आमच्या हक्कावर गदा आणणाऱ्या भामटया दलालांना लोकशाही नावाची काही गोष्ट असते याचाही बहुतेक विसर पडलेला दिसतो.
आम्ही कुणाची भीड न ठेवता निर्भिडतेने समाजकार्य करीत आहोत.आम्ही कुणाचे मिंधे नाहीत किंवा कुणाची भाड खाऊन मोठे झालेलो नाहीत.आम्हांला घटनेने दिलेल्या अधिकाराचाच आम्ही वापर करुन आमचा हक्क मागत आहोत.तर त्यात जळफळाट कसला?
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारालाच जर जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करुन चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात असेल तर यामागील नेमके राजकीय गौडबंगाल काय?याचाही खुलासा तर आता चौकशी अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे ठरते.
आम्ही या पत्रकार भवनच्या प्रश्नावर घेतलेल्या भुमिकेमुळे अनेकांचा तीळपापड झालेला असून,कोणत्याही क्षणी आमच्यावर प्राणघातक हल्ला होऊन त्यात आमचा जीवदेखील जाऊ शकतो.म्हणून आम्ही आमच्या जीवाला ज्या लोकांकडून धोका आहे त्यांच्या नावानिशी प्रतिज्ञापत्र अँफीडेव्हीट करुन ठेवलेले आहे.
तरीही त्याचे गांभिर्य प्रशासनाला कळू नये म्हणजे हे दुर्दैवच म्हटले पाहिजे.चौकशी अहवाल उपलब्ध करुन देण्याकामी मुद्दामहून टाळाटाळ केली जात आहे की,कुठल्या राजकीय दडपणामुळे वेळकाढू भुमिका पार पाडली जात आहे.वास्तविक या सगळ्या प्रकरणात गंभीर व भयानक
प्रकार असा आहे की,आज अक्षरशः संपादकाच्या म्हणजे आमच्या निवासस्थानाची टेहळणी करण्यासाठी कुणी अज्ञात भामटयांनी येऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला.तर आमचे हितशत्रु व कुटील कारवाया खेळणा-या बांडगुळाना एवढेच सांगावायाचे आहे की,डावपेच करुन किंवा षडयंत्र रचून आपण फक्त माणूस संपवू शकतात.त्यांची वैचारिक बुध्दीमता कधीच संपवू शकणार नाहीत.एवढेच यानिमिताने!

Previous article*कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने कोविड* *रूग्ण सापडले*
Next articleशाळा अनुदान च्या GR चे काम या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात होईल – आ.विक्रम काळे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here