Home Breaking News *कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने कोविड* *रूग्ण सापडले*

*कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने कोविड* *रूग्ण सापडले*

115
0

*कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने कोविड* *रूग्ण सापडले*

*युवा मराठा न्यूज*

कोल्हापूर जिल्ह्यात काल रविवारी ४६ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. एकूण ४८ हजार १८९ रुग्णांपैकी ४५ हजार ५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.आजतागायत जिल्ह्यात कोरोनामुळे१ हजार ६४१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ९८२ आहे.
४६ कोरोनाबाधित रुग्ण अहवालापैकी चंदगड ३, गगनबावडा १, हातकणंगले ५, करवीर ७, शाहूवाडी ३, शिरोळ ५, नगरपालिका कार्यक्षेत्रात १२ व महापालिका कार्यक्षेत्रात १० जण बाधित आढळले आहेत. रूकडी (ता. हातकणंगले) येथील १७ वर्षांच्या युवकाचा समावेश आहे. शनिवारी घेण्यात आलेल्या ८२० पैकी ७७५ व्यक्‍तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, कागल, पन्हाळा, राधानगरी तालुक्यात रविवारी एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही.

Previous article*ऊस दराबाबत शेतकऱ्यांचे लक्ष*
Next article*…..संपादकीय!* *”युवा मराठा” संपादकाच्या निवासस्थानाची टेहळणी करणारे भामटे;अन चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ!!*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here