Home Breaking News *ऊस दराबाबत शेतकऱ्यांचे लक्ष*

*ऊस दराबाबत शेतकऱ्यांचे लक्ष*

135
0

*ऊस दराबाबत शेतकऱ्यांचे लक्ष*

*युवा मराठा न्यूज*

सद्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराच्या प्रश्‍नावरून नेहमीप्रमाणे यंदाही साखर कारखानदार आणि शेतकर्‍यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली आहे; मात्र ही कोंडी लवकरात लवकर फुटण्याची गरज आहे. कारण, गाळप हंगाम लांबला तर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी आणि एकूणच साखर धंद्याच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्यात यंदा १०.६६ लाख हेक्टर इतके उसाचे विक्रमी क्षेत्र आहे. त्यातून सुमारे ८.५० कोटी टन ऊस गाळपास उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. हा सगळा ऊस गाळायचा झाल्यास राज्यातील किमान १८० कारखाने पूर्ण क्षमतेने चालू होण्याची गरज आहे; मात्र आजअखेर केवळ १५० कारखान्यांनाच गाळप परवाना मिळाला आहे.
अन्य सुमारे ३० कारखान्यांचे परवाने वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित आहेत.
उपलब्ध ऊस आणि हंगाम घेणारे कारखाने विचारात घेता यंदा १९० ते २०० दिवस म्हणजे मे महिन्याच्या मध्यापर्यंत कारखाने चालवावे लागतील. उसाचे प्रचंड प्रमाण विचारात घेऊन राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी केलेली होती; मात्र पावसासह अन्य कारणांनी अजूनही कारखाने पूर्ण क्षमतेने चालू होऊ शकलेले नाहीत.
शासनाच्या आदेशानुसार यंदा काही साखर कारखाने अजूनही कोव्हिड सेंटरची उभारणी आणि गेल्या हंगामातील एफआरपीची पूर्तता करू शकलेले नाहीत. कोरोनामुळे ऊसतोडणी मजूर धास्तावले आहेत.
राज्यातील अन्य व्यवसायांप्रमाणेच साखर कारखानदारीही यंदा कोरोनाच्या कचाट्यात सापडलेली आहे. जगभरातील लॉकडाऊनमुळे यंदा साखरेची निर्यात होऊ शकलेली नाही. या साखरेचा उठाव झाल्याशिवाय साखर कारखान्यांच्या हातात खेळते भांडवल उपलब्ध होण्यात अडचणी येणार आहेत. जशा साखर कारखान्यांच्या अडचणी आहेत, तशाच शेतकर्‍यांच्याही अडचणी आहेत. आधीच राज्यात यंदा उसाचे विक्रमी क्षेत्र आहे. कोरोनाच्या वणव्यामुळे समाजातील अन्य वर्गांप्रमाणे शेतकर्‍यांचेही अर्थकारण गडबडले आहे. शिवाय अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या कहरामुळे यंदा उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील ऊस भुईसपाट झाला आहे. त्यांना कोंब फुटू लागले आहेत. या उसाचे लवकरात लवकर गाळप झाले नाही, तर नजीकच्या काळात या उसाची चिपाडे होऊन जाणार आहेत. शिवाय गाळप हंगाम लांबत गेला, तर पाण्याच्या उपलब्धतेअभावी अनेक भागातील ऊस वाळून जाण्याचा धोका आहे.
ही सगळी परिस्थिती विचारात घेता यंदा गाळप हंगाम तातडीने सुरू होण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याची तयारी दर्शविली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र एकरकमी एफआरपीसह चौदा टक्के दरवाढीची मागणी केली आहे. याबाबतीत समन्वयाने तोडगा काढण्याची गरज आहे.

Previous article🛑 १० लाखांपेक्षा कमी किंमत, भारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार 🛑
Next article*कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने कोविड* *रूग्ण सापडले*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here