• Home
  • 🛑 १० लाखांपेक्षा कमी किंमत, भारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार 🛑

🛑 १० लाखांपेक्षा कमी किंमत, भारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार 🛑

🛑 १० लाखांपेक्षा कमी किंमत, भारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 02 नोव्हेंबर : ⭕ फेस्टिवल सीजन दरम्यान अनेक कार निर्माता ब्रँड्स अनेक मॉडल्स भारतात लाँच केले आहेत. तर अनेक मॉडल्स दिवाळीपर्यंत भारतात लाँच करणार आहेत. भारताच्या ऑटोमोबाइल बाजारात बजेट कारची विक्री जास्त आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा कार संबंधी माहिती देत आहोत. ज्या कार भारतात लाँच होणार आहेत. तसेच या कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

➡️ नवीन ह्युंदाई i20 :-

कंपनीने या कारसाठी भारतात बुकिंग्स ओपन केली आहे. कंपनी ५ नोव्हेंबर रोजी या कारला भारतात लाँच करणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत ६ लाख रुपये आणि टॉप मॉडलची किंमत ११ लाख रुपयांपर्यंत आहे.

➡️ रेनॉ HBC Kiger :-

रेनॉ या कार द्वारे भारतीय बाजारात पहिल्यांदा सब ४ मीटर एसयूव्ही लाँच करणार आहे. या कारमध्ये१.० लीटर ३ सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. या कारची किंमत ६.५ लाख रुपये ते ९ लाख रुपये या दरम्यान असू शकते.

➡️ टाटा एचबीएक्स :-

या कार द्वारे टाटा मायक्रो एसयूव्ही सेगमेंट मध्ये पाऊल ठेवणार आहे. कारला कंपनीने ऑटो एक्स्पो २०२० मध्ये आणले होते. या छोट्या एसयूव्ही मध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन मिळणार आहे. कारची किंमत ५ लाख रुपये ते ७ लाख रुपया दरम्यान असू शकते.⭕

anews Banner

Leave A Comment