• Home
  • 🛑 मराठा क्रांती मोर्चाचा कांजूरमार्ग येथे जोरदार आंदोलन 🛑

🛑 मराठा क्रांती मोर्चाचा कांजूरमार्ग येथे जोरदार आंदोलन 🛑

🛑 मराठा क्रांती मोर्चाचा कांजूरमार्ग येथे जोरदार आंदोलन 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई /कांजूरमार्ग :⭕ आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला दिसून येत असून मुंबई कांजूरमार्ग येथे समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे..

आपल्या समाजातील उच्चभ्रु, मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने प्रत्येकाला विचार करायला लावणारा हा सगळ्यात मोठा विषय आहे. “बांधवांनो” अभी नही तो फिर कभी नही। यासाठी आंदोलनात मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते..

मराठा आरक्षणाला काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड असंतोष खदखदत आहे. या समाजातील मुला मुलींचे भविष्य या निर्णयामुळे अंधकार बनल्याची भावना समाजात आहे…

महाराष्ट्र सरकारने कायदा बनवूनही मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली त्यामुळे मराठा समाजातील मुल-मुली शिक्षण व नोकरीपासून वंचित राहणार आहेत. हा पूर्ण मराठा समाजावर अन्याय आहे. याचा निषेध करण्यासाठी व आपल्या मागण्यांसाठी स्थानिक खासदार, आमदार यांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार होते.

पण स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

आंदोलन शांततापूर्ण मार्गाने निषेध आंदोलन करण्यात आले..

anews Banner

Leave A Comment