Home रत्नागिरी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या मोफत नेत्रतपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या मोफत नेत्रतपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

81
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220524-WA0007.jpg

छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या मोफत नेत्रतपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी,(युवा मराठा न्युज नेटवर्क) : सामाजिक बांधिलकी जपत अविरत काम करणा-या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे गुहागर आगारात एस.टि.कर्मचा-याकरीता मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे जिल्हातील सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

रत्नागिरीतील गुहागर आगार मध्ये हे नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले असून आजच्या या वेगवान जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये तसेच एस.टि कर्मचा-यांचे आरोग्य सुदृढ व सुरक्षित रहावे यासाठी छावा प्रतिष्ठान आणि नंदादिप नेत्रालय यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरात एस.टि कामगारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे संघटक व गुहागर आगाराचे वाहक समिर धावडे, रविंद्र पवार (स्थानक प्रमुख), संतोष ढोके ( वरिष्ठ लिपिक) व सर्व कर्मचारी वर्ग आदींसह बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleमहावितरण उठले शेतकऱ्यांच्या जीवावर।
Next articleकृषी दुकानदाराकडून शेतकऱ्याची आर्थिक लूट !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here